बेळगाव : प्रतिनिधी : अपघात झाल्यावर कारला आग लागल्याने कारमधील पोलीस निरीक्षकाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री धारवाड जवळ घडली. पंचाक्षरी सालीमठ असे दुर्दवी पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. (Police inspector dies after car catches fire)
लोकायुक्त पोलीस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ हे कार मधून एकटेच गदग येथून विवाह समारंभाला उपस्थित राहून धारवाडला परत येत होते. कारमधून परत येत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला आदळली. आणि कारने पेट घेतला. त्यामुळे त्यामुळे सालीमठ यांना कारमधून कारमधून बाहेर पडता आले नाही. कारने चारही बाजूने पेट घेतल्यामुळे सालीमठ यांचा होरपळून मृत्यू झाला.आग इतकी भीषण होती की सालीमठ यांच्या मृतदेहाची राख झाली होती. जागरुक नागरिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना अपघाताची माहिती दिली. अग्निशमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी कार जळून खाक झाली होती. त्यामध्ये सालीमठ यांचा मृत्यू झाला. (Police inspector dies after car catches fire)