Home » Blog » इराणचा अमेरिकेच्या २१ लष्करी तळांवर हल्ला

इराणचा अमेरिकेच्या २१ लष्करी तळांवर हल्ला

by प्रतिनिधी
0 comments
Iran attacks 21 US military bases

नवी दिल्ली : होर्मझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे एएच-६४ अपाचे लष्करी हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर अमेरिकेने इराणवर जोरदार हवाई हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर देताना मध्यपूर्वेतील देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या २१ लष्करी तळावर इराणने हल्ले करत प्रत्युत्तर दिले. अमेरिकेचे एक ड्रोनही पाडल्याचा दावा इराणने केला आहे. अमेरिकेचे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर दोन वैमानिकांना वाचवण्यात आले आहे. हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत एक टक्क्यांनी वाढली आहे. (Iran attacks 21 US military bases)

इराणचे हल्ले रोखल्याचा जॉर्डन, कुवेतचा दावा

इराणने डागलेली पाच क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा जॉर्डनने केला आहे. इराणने असा दावा केला आहे की बहरीनमधील अमेरिकेच्या नौदल ताफ्याला लक्ष्य केले आहे. जॉर्डनमधील अझराक हवाई तळांवरही हल्ला केला आहे. इराणचे क्षेपणास्त्रे कुवेतने त्यांच्या हवाई सरंक्षण प्रणालीने रोखल्याचा दावा केला आहे. जॉर्डननेही इराणच्या अल अझराक भागाच्या दिशेने डागलेली पाच क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे.

अमेरिकेचे इराणवर जोरदार हल्ले

अमेरिकेने इराणवर हल्ला केला असून अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनुसार दक्षिण इराणमधील हवाई सरंक्षण प्रणाली, रडार केंद्रे, या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणमधील जास्क, सिरिक आणि केशम येथील नागरी पायाभूत सुविधांवर अमेरिकेने हल्ला केला आहे असा आरोप इराणने केला आहे. (Iran attacks 21 US military bases)

अमेरिकन सैनिकांना लक्ष्य केल्याचा इराणचा दावा

इराणच्या आयआरजीने निवेदन प्रसिद्ध केले आहे. आज पहाटे शत्रूच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताता आयआरजीसी एरोस्पेसने लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करुन जॉर्डनमधील अल-अझराक येथील एका हवाई तळावरील एफ-३५ लढाई विमानांचे हँगर्स आणि अमेरिकन सैन्याचा कमांड आणि कंट्रोल सेंटर हल्ला करुन ती नष्ट करण्यात आली आहेत. अल जझिराच्या वृत्तानुसार अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराणने जॉर्डनमधील अमेरिकन सैनिकांना लक्ष्य केले आहे असे वृत्त दिले आहे. (Iran attacks 21 US military bases)

You may also like

error: Content is protected !!