Home » Blog » Done felicitated : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये : डोणे

Done felicitated : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये : डोणे

by प्रतिनिधी
0 comments
Done felicitated

कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी सचोटीने अभ्यास केला पाहिजे. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. ग्रामीण भागातील मुलेही प्रामाणिक कष्टातून यूपीएससीसारख्या अवघड परीक्षा पास होऊ शकतात. त्यासाठी न्यूनगंड सोडा आणि चिकाटीने अभ्यास करा, असा सल्ला आयपीएस बिरदेव डोणे यांनी दिला. (Done felicitated)

डोणे यांचा वसगडे, ता. करवीर येथील बुद्ध विहारात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.  लोकनियुक्त सरपंच योगिता बागडी यांच्याहस्ते हा सत्कार करण्यात आला.

डोणे म्हणाले, स्पर्धा परीक्षेसाठी किमान पाच तास अभ्यासाची तयारी ठेवली पाहिजे. मुले हीच पालकांची संपत्ती असतात. याची जाणीव मुलांनीही ठेवावी. विद्यार्थ्यांनी अपयशाला खचून न जाता सचोटीने प्रयत्न केले पाहिजेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमच्यासाठी सतत मार्गदर्शक आहेत, याचे भान ठेवून अभ्यास केला आणि दहावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर यश निश्चित मिळते, असे ते म्हणाले. (Done felicitated)

वंचित बहुजन आघाडीचे शाखाध्यक्ष सुनील कांबळे, आम्रपाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मनोहर भोसले, संस्थेचे दिनकर कांबळे, भानुदास भोसले, संदीप भोसले, अण्णा कामत, बाळासाहेब कांबळे, रमजान बेपारी, बाळासाहेब उपाध्ये, सुरेश वसगडेकर तसेच इयत्ता दहावी-बारावी, पदवीधर सरळ सेवा, एमपीएससी-यूपीएससीचे विद्यार्थी उपस्थित होते. सत्काराआधी डोणे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

हेही वाचा :
पंचगंगा हॉस्पिटल राज्यात प्रथम

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00