भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील १० जून २०२५ रोजी वयाची ६६ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या आजवरच्या वाटचालीतील दहा प्रमुख मुद्दे जाणून घेऊया. (Chandrkantdada)
-प्रतिनिधी
१. चंद्रकांत पाटील यांचा जन्म ११ जून १९५९ रोजी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील बच्चू पाटील गिरणी कामगार होते. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील खानापूर. त्यांचा जन्म प्रभूदास चाळ, रे रोड, मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय मुंबईत राजा शिवाजी विद्यालयातून, तर बी. कॉम्. पर्यंतचे शिक्षण सिद्धार्थ महाविद्यालयातून झाले.(Chandrkantdada)
२. चंद्रकांत पाटील यांना १९८० साली अभाविपमध्ये सक्रिय असतानाच यशवंतराव केळकर यांचे मार्गदर्शन लाभले. उत्तम संघटन कौशल्य आणि समर्पित भावनेमुळे अभाविपमध्ये त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
३. अभाविपमध्ये प्रचारक म्हणून काम थांबवल्यानंतर चंद्रकातंदादा पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय झाले. १९९५-९६ या कालावधीत त्यांच्याकडे संघाच्या पश्चिम महाराष्ट्राचे सहकार्यवाह म्हणून जबाबदारी होती. १९९९ पासून २००४ पर्यंत संघाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात त्यांचा मोलाचा सहभाग होता.
४. सलग तेरा वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेले चंद्रकातदादा पाटील १९९४ ते २००० पर्यंत रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य होते. २००० पासून २०१३ पर्यंत ते प्रबोधिनीचे सचिव होते.(Chandrkantdada)
५. अभाविप, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्येही संघटनात्मक पदावरील जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांची २००४ मध्ये राजकारणात प्रवेश केला. संघाचे प्रतिनिधी असल्यामुळे भाजपमध्ये त्यांचा दरारा वाढला. त्यांच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि दक्षिण महाराष्ट्र विभाग प्रमुख अशी जबाबदारी सोपविण्यात आली.
६. राजकारण प्रवेशानंतर चार वर्षे केलेल्या कामाची पोचपावती चंद्रकांतदादा पाटील यांना २००८ मध्ये मिळाली. भाजपकडून त्यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली. ती जागा त्यांनी जिंकली.
७. त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांना २०१४ मध्येही याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा उमेदवारीची संधी दिली. यावेळी निवडणूक चुरशीची झाली, परंतु ते विजयी झाले.(Chandrkantdada)
८. २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली.
९. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडील महसूल खाते चंद्रकांतदादांच्याकडे आले. ते मंत्रिमंडळातील दुस-या क्रमांकाचे मंत्री बनले.
१०. २०१९ मध्ये चंद्रकांतदादा यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले.