Tennis : मेदवेदेव, फ्रिट्झ यांची आगेकूच

Tennis

Tennis

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये टेलर फ्रिट्झ, डॅनिल मेदवेदेव या मानांकनप्राप्त खेळाडूंनी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत विजय नोंदवले. पुरुष दुहेरीत मात्र, भारताच्या रोहन बोपण्णाला कोलंबियाच्या निकोलास बॅरिएंटॉसच्या साथीने पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. (Tennis)

मागील वर्षीचा उपविजेता असणाऱ्या पाचव्या मानांकित मेदवेदेवला सलामीच्या सामन्यात थायलंडच्या कासिडिट समरेझविरुद्ध विजयासाठी पाच सेटपर्यंत झुंजावे लागले. तब्बल ३ तास ८ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात मेदवेदेवने अखेरीस ६-२, ४-६, ३-६, ६-१, ६-२ असा विजय मिळवला. पुढील फेरीत त्याचा सामना अमेरिकेच्या लर्नर तिएनशी होईल. चतुर्थ मानांकित अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झने पहिल्या फेरीत अमेरिकेच्याच जेन्सन ब्रुक्सबायला ६-२, ६-०, ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. पुढील फेरीत तो चिलीच्या क्रिस्टियन गॅरिनशी खेळणार आहे. (Tennis)

महिला एकेरीमध्ये इटलीच्या चौथ्या मानांकित जॅस्मिन पाओलिनीने चीनच्या शिजिओ वेईला ६-०, ६-४ असे हरवले. कझाखस्तानच्या सहाव्या मानांकित एलेना रायबाकिनाने ऑस्ट्रेलियाच्या इमर्सन जोन्सचा ६-१, ६-१ असा पराभव केला. दोनवेळा या स्पर्धेची विजेती ठरलेल्या जपानच्या नाओमी ओसाकाने पहिल्या फेरीमध्ये फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियावर ६-३, ३-६, ६-३ अशी मात केली. (Tennis)

बोपण्णा-बॅरिएंटॉस सलामीलाच गारद

भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कोलंबियाचा साथीदार निकोलास बॅरिएंटॉस यांना पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझ आणि जॉमे मुनर या बिगरमानांकित जोडीने चौदाव्या मानांकित बोपण्णा-बॅरिएंटॉस जोडीला ७-५, ७-६(७-५) असे नमवले. हा सामना १ तास ५४ मिनिटे रंगला. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये भारताचे एन. श्रीराम बालाजी आणि रित्विक चौधरी बोल्लिपल्ली हे टेनिसपटूसुद्धा भिन्न साथीदारांसोबत सहभागी झाले आहेत.

हेही वाचा :

Related posts

Om Prakash

Om Prakash : पोलिस अधिकाऱ्याची राहत्या घरी हत्या

Lodha

Lodha : मंत्री मंगलप्रसाद लोढा निव्वळ नाटक करतात

RCB beats PK

RCB beats PK : बेंगळरूची पंजाबला परतफेड