इक शहंशाह ने…

-प्रा. आय. जी. शेख

ताजमहल

ताज तेरे लिए इक मज़हर-ए-उल्फ़त ही सही 

तुझ को इस वादी-ए-रंगीं से अक़ीदत ही सही 

मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से 

बज़्म-ए-शाही में ग़रीबों का गुज़र क्या मअ’नी 

सब्त जिस राह में हों सतवत-ए-शाही के निशाँ 

उस पे उल्फ़त भरी रूहों का सफ़र क्या मअ’नी 

मेरी महबूब पस-ए-पर्दा-ए-तश्हीर-ए-वफ़ा 

तू ने सतवत के निशानों को तो देखा होता 

मुर्दा-शाहों के मक़ाबिर से बहलने वाली 

अपने तारीक मकानों को तो देखा होता 

अन-गिनत लोगों ने दुनिया में मोहब्बत की है 

कौन कहता है कि सादिक़ न थे जज़्बे उन के 

लेकिन उन के लिए तश्हीर का सामान नहीं 

क्यूँकि वो लोग भी अपनी ही तरह मुफ़्लिस थे 

ये इमारात ओ मक़ाबिर ये फ़सीलें ये हिसार 

मुतलक़-उल-हुक्म शहंशाहों की अज़्मत के सुतूँ 

सीना-ए-दहर के नासूर हैं कोहना नासूर 

जज़्ब है उन में तिरे और मिरे अज्दाद का ख़ूँ 

मेरी महबूब उन्हें भी तो मोहब्बत होगी 

जिन की सन्नाई ने बख़्शी है उसे शक्ल-ए-जमील 

उन के प्यारों के मक़ाबिर रहे बेनाम-ओ-नुमूद 

आज तक उन पे जलाई न किसी ने क़िंदील 

ये चमन-ज़ार ये जमुना का किनारा ये महल 

ये मुनक़्क़श दर ओ दीवार ये मेहराब ये ताक़ 

इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर 

हम ग़रीबों की मोहब्बत का उड़ाया है मज़ाक़ 

मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से 

‘साहीर’ लुधियानवी

ताजमहल. जगभरातल्या सुंदर वास्तूंपैकी एक. नजाकत, सौंदर्य आणि प्रेमाची सुंदर अभिव्यक्ती. एक अभिजात काव्यकलाकृतीच जणू. त्यावर सुप्रसिद्ध उर्दू शायर ‘साहीर’ लुधियानवी यांनी लिहिलेली ‘ताजमहल’ ही प्रसिद्ध नज़्म (कविता). एकेकाळी या नज़्मने अक्षरश: धमाल उडवली होती. प्रसिद्ध साहित्यिक अमृता कौर-प्रीतम याच कवितेवर साहीर यांच्या प्रेमात अक्षरश: वेड्या झाल्या होत्या. ताजमहल आणि शहाजहाँच्या रसिक अभिव्यक्तीविषयी जगभरातील अनेक भाषांमध्ये काव्यरचना झाल्या. साहीरची ही कविता मात्र त्या पारंपरिकतेला छेद देणारी, तरीही हृदयाचा ठाव घेणारी. तिचे रसग्रहण.

  • या नज्ममध्ये (कविता) कवी साहीर म्हणतात, प्रिये, तुझ्यासाठी हा ताज एक प्रेमाचं प्रतिक असेलही. त्याचे सौंदर्य, तो रमणीय परिसर, तो वैभवशाली भूतकाळ सुखद वाटत असेलही…
  • पण प्रिये मला नाही हे सर्व मान्य. हे ठिकाण सोडून तू मला कुठेतरी अन्यत्र भेटत जा. हे ठिकाण म्हणजे शहींशाहचा दरबार, श्रीमंतीचा थाट मिरवणाऱ्यांची मैफल. इथे तुझ्या-माझ्यासारख्या गरीब, सामान्य प्रेमीयुगलांच्या येण्याला काय अर्थ?
  • या राजमहालांच्या रस्त्यांनी कधीकाळी घोड्यांच्या टापांनी धूळ उडवत जाणारे सैनिक पाहिले असतील, त्या दृश्यांनी सामान्य माणूस भेदरून गेला असेल. अशा या रस्त्यावर प्रेमी जीवांचा वावर असणे याला काय अर्थ आहे का?
  • मृत राजा-राणींच्या कबरीवर बांधलेल्या सुंदर थडग्यांना पाहून भुलणारी तू, आपल्या स्वत:च्या अंध:कारमय झोपडीकडे बघ जरा.
  • अगणित लोक प्रेम करतात. त्या असंख्य जोडप्यांचं प्रेम नव्हतं का?
  • पण त्यांच्याकडे या शहजाद्यासारखं आपल्या प्रेमाचा देखावा आणि प्रदर्शन करण्याचं साधन नव्हतं.
  • हे डोळे दीपवणारे महाकाय इमले, अलंकारित मकबरे, अभेद्य तटबंदी आणि हे किल्ले सत्ताधीश सम्राटाचे, शहींशाहच्या वैभवाचे प्रतिक आहेत.
  • माझ्यादृष्टीनं म्हटलीस तर हे पृथ्वीच्या उरावरचे भळभळणारे गळू आहे. याच गळूच्या गर्भात साठून राहिलेत तुझ्या-माझ्या पूर्वजांचे रक्त.
  • त्या आपल्या पूर्वजांनीसुद्धा प्रेम केलं असेल ना गं. त्यांच्याच सुंदर हातांनी या सगळ्या वास्तूंवर नक्षीकाम केलंय. त्यांच्या नजरेनं आणि कल्पकतेनं या भव्यतेला सौंदर्याचं कोंदण लाभलंय.
  • पण अरेरे! त्यांच्या प्रेमाची या मकबऱ्यांना मात्र ओळखच नव्हती, ते अज्ञाताच्या काळोखातच राहिले. आजतागायत कुणी त्यांच्यावर कंदील का साधी मेणबत्तीसुद्धा पेटवली नसणार.
  • या बागा, फुलांचे ताटवे, हा यमुना नदीचा किनारा आणि तिच्या काठी उभारलेली ताजमहलची भव्य वास्तू. त्याचे नक्षीदार दरवाजे, भिंती, मोठमोठ्या दिवळ्या आणि कोनाडे. आपल्यासारख्यांसारखी हे कदापी शक्य नाही.
  • एका शहंशाहने आपल्या अमाप संपत्तीचा वापर करून ही सुंदर वास्तू उभारली आणि आम्हा गरीब प्रेमी युगुलांची थट्टाच केलीय. म्हणून प्रिये हे ठिकाण नाही आवडत मला.
  • म्हणून सांगतो हे ठिकाण सोडून कुठंतरी अन्यत्र भेटत जा मला…

Related posts

पोटातले ओठावर!

हिंदुदुर्ग!

Lok Sabha : खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ