SpaDeX Docking : ‘इस्रो’ने रचला इतिहास !

ISRO

बेंगळुरु : भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रोने) अवकाशात भ्रमण करणारी दोन अवकाशयाने जोडण्यात (स्पेस डॉकिंग) यश मिळवले. यानिमित्ताने देशाच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांतील एक मैलाचा टप्पा इस्रोने पार केला आहे. या यशामुळे भारतीय सैन्याच्या स्वत:च्या नवीन अवकाश-आधारित कार्यक्रमांनाही चालना मिळणार आहे. ही क्षमता विकसीत करणारा भारत जगातला चौथा देश ठरला आहे.

‘इस्रो’चा पहिला स्पेस डॉकिंग प्रयोग (SpaDeX) सुरू होण्याआधीच भारतीय वायुसेनेने ही आवश्यकता व्यक्त केली होती. अंतराळात आधीपासून असलेल्या यंत्रणांमध्ये इंधन भरणे, त्यांची देखरेख आणि ते अपग्रेड करण्यासाठी आवश्यक ‘ऑन-ऑर्बिट मेंटेनन्स अँड रिफ्युएलिंग (OOMR) साठी ऑटोनोमस डॉकिंग ऑपरेशन्स’ची गरज व्यक्त करण्यात आली होती.

हेरगिरी आणि दळणवळणाला मोठी चालना

सामरिक हेरगिरीसाठी भारतीय सशस्त्र दल मुख्यत्वे उपग्रहांवर अवलंबून असते. विद्यमान अनेक उपग्रहांव्यतिरिक्त, हेरगिरीसाठी आणि दळणवळणासाठी इतर उपग्रह आहेत. तथापि, स्पेस डॉकिंगमुळे ही यंत्रणा भक्कम होणार आहे.

१९९९ च्या कारगिल युद्धानंतर उपग्रहांची गरज अधोरेखित झाली. विशेषत: या क्षेत्रातील आपल्या क्षमतेची कमतरता गांभीर्याने जाणवली. शिवाय परदेशांनी दिलेल्या संरक्षण क्षेत्रातील काही कालबाह्य तंत्रज्ञानामुळे भारताची हानी झाली.

या पार्श्वभूमीवर हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगून, इस्रोने गुरुवारी (१६ जानेवारी) स्पेस डॉकिंग प्रयोग (SpaDeX) यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे जाहीर केले. ही क्षमता विकसीत करणारा भारत हा रशिया, युनायटेड स्टेट्स आणि चीननंतरचा चौथा देश ठरला आहे.

मिशन फत्ते

डॉकिंगसंबंधीच्या ‘‘१५-मीटर ते ३-मीटर होल्ड पॉइंटपर्यंतच्या क्रिया पूर्ण झाला. डॉकिंग अचूकतेने सुरू केले, त्यामुळे अंतराळयान यशस्वीपणे जोडले गेले. तसेच सहजपणे मागे घेणेही शक्य झाले,” असे इस्रोने त्याच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर म्हटले आहे.

‘एकच ऑब्जेक्ट म्हणून दोन उपग्रहांचे नियंत्रण यशस्वी झाले आहे. अनडॉकिंग आणि पॉवर ट्रान्सफर तपासण्या येत्या काही दिवसांत फॉलो केल्या जातील,’ असेही या पोस्टमध्ये इस्रोने म्हटले आहे.

SpaDeX ३० डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी श्रीहरिकोटा येथून पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) वरून प्रक्षेपित करण्यात आले होते. त्यानंतर ‘SDX01 चेझर’ आणि ‘SDX02 टार्गेट’ या दोन उपग्रहांना जोडण्याची प्रक्रिया ७ जानेवारीला पूर्ण करण्यात येणार होती. तथापि,

अतिरिक्त सिम्युलेशनची आवश्यकता आणि ऑर्बिटल मॅन्युव्हर्स दरम्यान अपेक्षेपेक्षा जास्त उपग्रहांचा प्रवाह यासारख्या तांत्रिक मुद्द्यांमुळे डॉकिंग पुढे ढकलण्यात आले. इस्रोला सावधपणे पुढची पावले टाकली. १२ जानेवारी रोजी, उपग्रह अंतर टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले. दोन्ही अंतराळयानांना ३- मीटर इतके जवळ आणले गेले आणि मिळालेल्या डेटाच्या आधारे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शेवटचे पाऊल उचलले.

हेही वाचा :
 ५१ हजारांवर स्नातकांना मिळणार पदवी

Related posts

Pay Commission : आठवा वेतन आयोग २०२६ पासून?

Lauren Powell : लॉरेन पॉवेल झाल्या कमला !

Drone Crash : ‘अदानी मेड’ ड्रोन क्रॅश