दक्षिण आफ्रिकेचा विजय

डर्बन : यजमान दक्षिण आफ्रिकेने शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला कसोटी क्रिकेट सामना २३३ धावांनी जिंकला. याबरोबरच आफ्रिकेने दोन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

विजयासाठी ५१६ धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवस्था तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावामध्ये ५ बाद १०३ अशी झाली होती. चौथ्या दिवशी दिनेश चंदिमल आणि कर्णधार धनंजय डिसिल्वा यांनी अर्धशतके झळकावून थोडाफार प्रतिकार केला. परंतु, पराभव वाचवण्यासाठी त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. चंदिमलने १७४ चेंडूंमध्ये १२ चौकारांसह ८३, तर डिसिल्वाने ८१ चेंडूंमध्ये ९ चौकार व एका षटकारासह ५९ धावा केल्या. मार्को यान्सनने ८० व्या षटकात असिथा फर्नांडोची विकेट घेऊन श्रीलंकेचा डाव २८२ धावांवर संपवला. पहिल्या डावात ७ बळी घेणाऱ्या यान्सनने दुसऱ्या डावामध्ये ७३ धावांमध्ये ४ विकेट घेऊन सामन्यातील दहा बळी पूर्ण केले.

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत