South Africa : दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी मालिका विजय

South Africa

केपटाउन : यजमान दक्षिण आफ्रिकेने कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर चौथ्या दिवशी १० विकेटनी सहज विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकेने दोन कसोटींची ही मालिका २-० अशी एकतर्फी जिंकली. त्याचबरोबर जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेतील (वर्ल्ड चॅम्पियनशीप) आफ्रिकेचा हा सलग सातवा विजय ठरला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान आफ्रिकेने यापूर्वीच निश्चित केले आहे. (South Africa)

दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेने पहिल्या डावात ४२१ धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर पाकवर फॉलोऑन लादला होता. कर्णधार शान मसूदचे शतक आणि अन्य फलंदाजांच्या योगदानामुळे पाकने दुसऱ्या डावात ४७८ धावा करून डावाने पराभव टाळण्यात यश मिळवले. मसूदने चेंडूंमध्ये १७ चौकारांसह १४५ धावांची खेळी करत बाबर आझमसोबत २०५ धावांची सलामीही दिली. बाबरने १२४ चेंडूंमध्ये १० चौकारांसह ८१ धावांची खेळी केली. महंमद रिझवान (४१), सलमान आघा (४८) आणि आमेर जमाल (३४) यांनीही फॉलोऑन टाळण्यास हातभार लावला. पाकचा सैम अयुब दुखापतीमुळे फलंदाजीस येऊ शकला नाही. आफ्रिकेकडून कॅगिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी ३, तर मार्को यान्सनने २ विकेट घेतल्या. (South Africa)

अखेरच्या सत्रात डेव्हिड बेडिंघम आणि एडन मार्क्रम या सलामी जोडीने अवघ्या ७.१ षटकांत बिनबाद ५८ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले. बेडिंघमने नाबाद ४४, तर मार्क्रमने नाबाद १४ धावा फटकावल्या. पहिल्या डावात २५९ धावांची खेळी करणारा आफ्रिकेचा फलंदाज रायन रिकलटन सामनावीर ठरला. मालिकेत १० विकेट घेण्यासोबतच ८० धावा करणाऱ्या मार्को यान्सनला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. (South Africa)

  • संक्षिप्त धावफलक
    दक्षिण आफ्रिका – पहिला डाव ६१५ आणि दुसरा डाव ७.१ षटकांत बिनबाद ५८ (डेव्हिड बेडिंघम नाबाद ४४, एडन मार्क्रम नाबाद १४) विजयी विरुद्ध पाकिस्तान – पहिला डाव १९४ आणि दुसरा डाव – १२२.१ षटकांत सर्वबाद ४७८ (शान मसूद १४५, बाबर आझम ८१, सलमान आघा ४८, महंमद रिझवान ४१, कॅगिसो रबाडा ३-११५, मार्को यान्सन २-१०१, केशव महाराज ३-१३७.)

हेही वाचा :
बुमराह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेस मुकणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १२ जानेवारीला संघनिवड

Related posts

KSA Football : ‘खंडोबा’ला ‘जुना बुधवार’ने रोखले

Badminton : छत गळतीमुळे प्रणॉयचा सामना थांबवला

Sam Konstas : ‘होय, चूक माझीच होती!’