शुभमन गिल दुखापतग्रस्त

पर्थ, वृत्तसंस्था : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान होणारी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका अवघ्या एका आठवड्यावर आली असताना भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतींनी सतावले आहे. लोकेश राहुल आणि सर्फराझ खान यांच्यापाठोपाठ शनिवारी भारताचा शुभमन गिलही दुखापतग्रस्त झाला. (Shubman Gill)

सरावादरम्यान भारतीय संघ आपांपसांत सामना खेळत होता. त्यावेळी, क्षेत्ररक्षण करताना गिलच्या डाव्या हाताचा अंगठा दुखावला. या दुखापतीनंतर गिल सरावातून बाहेर पडला. गिलच्या अंगठ्यास फ्रॅक्चर असल्याच्या बातम्या येत असल्या, तरी अद्याप अधिकृत सूत्रांकडून याबाबत पुष्टी करण्यात आलेली नाही. बॉर्डर-गावसकर मालिकेतील पहिली कसोटी २२ नोव्हेंबरपासून पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्य संघातील खेळाडूंच्या दुखापतींच्या पार्श्वभूमीवर भारत अ संघाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला मधल्या फळीतील फलंदाज देवदत्त पडीक्कल याला ऑस्ट्रेलियातच थांबण्याची सूचना करण्यात आल्याचे समजते.

Related posts

Indian women’s win : भारताचा मोठा विजय

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!