SC slams YouTuber: रणवीरच्या मनातली विकृती बाहेर आली…

SC slams YouTuber

SC slams YouTuber

नवी दिल्ली : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये रणवीर अल्लाबादियाने केलेली टिप्पणी अत्यंत घाणेरडी आणि विकृत आहे. त्याच्या मनात जी विकृती आहे ती या कार्यक्रमात बाहेर आली. त्याने आयाबहिणींचा आणि पालकांचा अपमान केला आहे. न्यायालयाने त्याची बाजू का घ्यावी?, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने अल्लाबादियाची कानउघाडणी केली.(SC slams YouTuber)

याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोतीश्वर सिंग यांच्या खंडपीठानेही रणवीरच्या टिप्पणीचा चांगलाच समाचार घेतला, तथापि त्याला अटकेपासून अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. या एपिसोडशी संबंधित यापुढे कोणतीही एफआयआर नोंदवले जाणार नाहीत, असेही कोर्टाने स्पष्ट केले. (SC slams YouTuber)

रणवीरला दिलेला दिलासा सशर्त आहे. त्याने तपासात किती सहकार्य केले यावर तो अवलंबून असेल. न्यायालयाने अल्लाबादियाला त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश दिले. परवानगीशिवाय देश सोडण्यास मनाई केली.

देशभरात त्याच्या विरोधात नोंदवलेल्या अनेक एफआयआरवर रणवीरने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्ट सुनावणी करत होते. माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे पुत्र अभिनव हे रणवीरची बाजू मांडत आहेत.

केंद्र सरकारसह महाराष्ट्र आणि आसाम सरकार या याचिकेत प्रतिवादी आहेत.

चंद्रचूड म्हणाले की त्यांच्या अशीलाने वापरलेली भाषा पाहून मला तिरस्कार वाटत होता, परंतु हा काही गुन्हा आहे का हा प्रश्न कायम आहे. यावेळी त्यांनी अपूर्व अरोरा प्रकरणातील निकालाचाही हवाला दिला. (SC slams YouTuber)

त्यावर “ही अश्लीलता नाही तर मग अश्लीलता कशाला म्हणायचे? [अपूर्व अरोरा खटल्यातील] निकाल म्हणजे तुम्हाला जे हवे ते बोलण्याचा परवाना आहे का?”, असा सवाल न्यायमूर्ती कांत यांनी विचारला.

रणवीरला उद्देशून न्यायमूर्ती कांत म्हणाले, “त्याच्या मनात काहीतरी खूप घाणेरडे आहे. ते तो या कार्यक्रमात ओकला. तो पालकांचाही अपमान करत आहे. न्यायालयाने त्याची बाजू का घ्यावी?”

त्याने शो दरम्यान जे शब्द वापरले ते पालक, बहिणी आणि मुली आणि संपूर्ण समाजाला लज्जा वाटावे असेच आहेत, असा संतापही न्यायमूर्ती कांत यांनी व्यक्त केला. (SC slams YouTuber)

चंद्रचूड यांनी त्यांच्या अशिलाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा खंडपीठाने, राज्य याची काळजी घेईल असे सांगितले.

Related posts

India’s major decisions

India’s major decisions: सिंधू करार स्थगित, अटारी चेक पोस्ट बंद

Luxury Goods

Luxury Goods : महागड्या वस्तू घेताय?… १% टीसीएस लागू

Punishment

Punishment : विनयभंग करणाऱ्या शिक्षकास सक्तमजुरी