महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार हरियाणा विधानसभा निवडणुकीत ४७ जागांवर भाजप आघाडीवर आहे तर काँग्रेस ३८ जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष १, भारतीय लोकदल १ आणि तीन जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत. परिणामी, या निवडणुकीत भाजपला पुन्हा यश मिळताना दिसते आहे. (Savitri Jindal)
हिसार विधानसभा मतदारसंघात सावित्री जिंदाल आघाडीवर आहेत. शेवटच्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून जिंदाल यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे. सावित्री जिंदाल यांना भाजपनं उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
देशातील सर्वात श्रीमंत महिला…
सावित्री जिंदाल या सध्या सावित्री जिंदाल अँड फॅमिली ग्रुपच्या प्रमुख आहेत. फोर्ब्स बिलेनियर इंडियन लिस्टमध्ये त्या तिसऱ्या स्थानावर आहेत. जागतिक पातळीवरील यादीचा विचार केला असता त्या 37 व्या स्थानावर आहेत. भारतातील श्रीमंतांच्या यादीत त्या तिसऱ्या स्थानावर आहेत. श्रीमंत महिलांचा विचार केला असता त्या पहिल्या स्थानावर आहेत. त्यांची नेटवर्थ ४२८० कोटी रुपये आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्या भाजपमध्ये गेल्या होत्या. मात्र, त्यांना भाजपनं तिकीट न दिल्यानं नाराज होत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. सावित्री जिंदाल या हरियाणामधील भाजपचे खासदार नवीन जिंदाल यांच्या आई आहेत. भाजपनं सावित्री जिंदाल यांच्याऐवजी कमल गुप्ता यांना उमेदवारी दिली होती. (Savitri Jindal)
सावित्री जिंदाल यांना १२ व्या फेरीपर्यंत ४९२३१ मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या राम निवास रारा यांना ३०२९० मतं मिळाली तर, भाजपचे कमल गुप्ता यांना १७३८५ मतं मिळाली. भाजपनं ज्या कमल गुप्ता यांच्यासाठी सावित्री जिंदाल यांना उमेदवारी नाकारण्यात आली ते तिसऱ्या स्थानावर आहेत.१२ व्या फेरीपर्यंत सावित्री जिंदाल १८९४१ मतांनी आघाडीवर आहेत.
एक्झिट पोलचे अंदाज हरियाणामध्ये यावेळी देखील चुकले असल्याचं स्पष्ट झालं आहे. हरियाणा राज्यात काँग्रेसच्या बाजूनं वातावरण असताना देखील त्यांना यश मिळवता आलं नसल्याचं चित्र आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागांमध्ये या वेळी वाढ झाली आहे. हरियाणा राज्यातील जनतेनं पुन्हा एकदा भाजपला पसंती दिल्याचं चित्र आहे.
हेही वाचा :