संभाजीराजे छत्रपती मुंबईत; सरकारविरोधात आंदोलन

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन केले. मात्र,अजूनही या कामाला सुरुवात झालेली नाही. गुजरातमध्ये सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला. पण, महाराष्ट्रात एल अँड टी कंपनीला टेंडर देण्यात आले त्यांना गेल्या आठ वर्षात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करता आला नाही. शिवस्मारकासाठीचे करोडो रुपये कुठे गेले? असा उद्वीग्न सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी केला. आज (दि.६) त्यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधण्याची मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Sambhaji Raje Chatrapati)

गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं जलपूजन केल्यानंतर मी एक-दोन वर्षे थांबलो होतो. त्यानंतर मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि त्यानंतरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवस्मारकाबाबत विचारणा केली. शिवस्मारक बांधण्यासाठी समिती स्थापन होऊन काम का सुरु झाले नाही, असे मी विचारले. त्यावर मला सांगण्यात आलं की, अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या सगळ्या परवानग्या मिळालेल्या नाहीत.  केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे. मग हा प्रश्न मार्गी का लागत नाही, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला. (Sambhaji Raje Chatrapati)

१०० टक्के क्लीअरन्स नसताना पंतप्रधान मोदींनी जलपूजनाला कसे केले

सर्व परवानग्या मिळाल्या नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शिवस्मारकाच्या जलपूजनाला कसे आले? आम्ही शोध मोहीमे वेळी कायदा हातात घेणार नाही. पण आम्हाला समुद्रात जाऊ न देण्यासाठी बोटवाल्यांना भाजपकडून धमकावले जात आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. पण आम्ही शिवस्मारकाचं जलपूजन झालेल्या जागी पोहोचणारच, असा निर्धार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.

संभाजीराजेंचा ताफा पोलिसांनी रोखला

पुण्याहून निघालेल्या संभाजी राजे छत्रपतींच्या रॅलीला मुंबई पोलिसांनी अडवलं.. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं…यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली…संभाजीराजे अरबी समुद्राकडेजाण्यावर ठाम आहेत.. तर संभाजीराजे छत्रपतींनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय…तर पाच हजार तिकीट काढले आणि दुर्बिणीतून पाहू आणि स्मारकाचं अभिवादन करू असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय…

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ