Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला, गृहखाते पुन्हा टार्गेटवर

मुंबई : परभणी आणि बीडच्या घटनांमुळे महाराष्ट्राचे गृहखाते वादाच्या केंद्रस्थानी असतानाच सैफ अली खानवरील (Saif Ali Khan Attack) हल्ल्यामुळे ते पुन्हा टीकेचे लक्ष्य बनले आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री त्याच्या मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील घरात हल्ला झाला. अडीच वाजण्याच्या सुमारास चोरटा घरात घुसला. त्याने आधी मोलकरणीशी वाद घातला. आवाज ऐकून बाहेर आलेल्या सैफने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, असता झालेल्या झटापटीत चोरट्याने सैफवर चाकूहल्ला केला, त्यात गंभीर जखमी झाला.सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. (Saif Ali Khan Attack)

सैफवरील हल्ल्यानंतर मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सैफची पत्नी करीना कपूरकडून एक निवेदन प्रसिद्धीस देऊन सैफची प्रकृती ठीक असल्याचे म्हटले आहे. (Saif Ali Khan Attack)

समोर आलेल्या अधिकृत माहितीनुसार मध्यरात्रीनंतर अडीच वाजता अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात चोरटा घुसला. आधी त्याने घरातल्या मोलकरणीसोबत वाद घातला. आवाजामुळे सैफ बाहेर आला त्याने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने सैफवर हल्ला केला. या घटनेत सैफ जखमी झाला.

मुंबईतील झोन नऊचे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी यासंदर्भात सांगितले की, “अभिनेता सैफ अली खानच्या घरात अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली. सैफ व घुसखोर यांच्यात झटापट झाली. या घटनेत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.”

डॉक्टरांचे निवेदन

जखमी सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैफच्या प्रकृतीसंदर्भात लीलावती रुग्णालयाचे सीओओ सीओओ डॉ निरज उत्तमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार “त्याला पहाटे साडेतीन वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. त्याला सहा जखमा झाल्या आहेत, त्यापैकी दोन जखमा खोल आहेत. एक जखम मणक्याजवळ झाली आहे. आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत,” न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. (Saif Ali Khan Attack) (Kareena Kapur)

प्रकृती धोक्याबाहेर

गुरुवारी दुपारनंतर सैफच्या टीमने एक निवेदन जारी केले. “सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली.  त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. डॉक्टर त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत आणि पोलिस या घटनेचा तपास करत आहेत,” असे त्यात लिहिले आहे. या टीमने डॉक्टरांचे तसेच चाहते आणि हितचिंतकांचे आभार मानले आहेत. “आम्ही डॉ. निरज उत्तमानी, डॉ. नितीन डांगे, डॉ. लीना जैन आणि लीलावती हॉस्पिटलच्या टीमचे आभार मानतो.  सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांनी केलेल्या प्रार्थनेसाठी धन्यवाद,” असे या निवेदनात म्हटले आहे.

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्याची पत्नी करीना कपूरमार्फत एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, “रात्री सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी घरफोडीचा प्रयत्न झाला. सैफला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित आहेत. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना याप्रकरणी संयम बाळगण्याची विनंती करतो, तसेच या प्रकरणी कोणत्याही अफवा पसरवू नये, कारण पोलीस तपास करत आहेत. काळजीबद्दल सर्वांचे आभार,”

संजय राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सैफवरील हल्ल्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. मुंबई असो, बीड असो किंवा परभणी सगळीकडे कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. पंतप्रधानाचं आगतस्वागत, निवडणूक, शिबीरे यामध्ये सरकार गुंतून पडले आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तो मोठा कलाकार आहे. बुधवारी पंतप्रधान मुंबईत होते, सगळी सुरक्षा तिकडे असणार. पंतप्रधान मुंबईत असले तरीही महाराष्ट्रात काय चालले आहे हा प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारला पाहिजे.

हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी धक्का असल्याचे सांगून राऊत म्हणाले, १५ दिवसांपूर्वी सैफ अली खान कुटुंबासह मोदींना भेटायला गेले होते. पंतप्रधान मोदींनी एक तास त्यांच्या कुटुंबासह घालवला होता. त्यानंतर सैफ अली खानवर हल्ला झाला. या राज्यात कुणीही सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणं कठीण झालं आहे. या राज्याची ९० टक्के सुरक्षा आणि पोलीस हे आमदार, फुटलेल्या लोकांसाठी आहेत. गद्दारांना सुरक्षा पुरवली जाते. सैफ अली खानला सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला आहे. मात्र पद्मश्री किताब असूनही मुंबईत सैफ अली खान यांना सुरक्षित राहू शकत नाही हे वास्तव आहे.

हेही वाचा :
लॉरेन पॉवेल झाल्या कमला !

Related posts

Gang Rape : भाजप प्रदेशाध्यक्षावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा

UP Men Abducted : मागणी घालायला गेले; तिनेच अपहरण केले

Dalit Women Raped :दलित तरुणीच्या ‘केरळ स्टोरी’ने हादरा