२६/११ हल्ल्याचा आरोपी अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू

नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील प्रमुख आरोपी मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिल अब्दुल रहमान मक्की याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफीज सईदचा तो नातेवाईक होता. मुंबईवरील हल्ला हाफिस सईद आणि हाफिज मक्की याने रचला होता. पाकिस्तानमधील लाहोर येथे हृदयविकाराच्या झटकाने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आले आहे.  (Rehman Makki)

संयुक्त राष्ट्र संघटनेने मक्कीला २०२३ मध्ये जागतिक दहशतवादी घोषीत केले होते. त्याची सर्व संपत्तीही जप्त केली होती. तो जमात-उद-दावाचा प्रमुख होता. भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मक्कीचा थेट हात असायचा.

पाकिस्तान दहशतवादीविरोधी न्यायालयाने २०२० मध्ये टेरर फंडिंग प्रकरणात सहा महिन्याची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर त्याने आपल्या हालचाली कमी केल्या होत्या. मक्कीवर दहशतवाद्यांना वित्त पुरवठा, कट रचने, दहशतवादी भरती केल्याचा आरोप होता. (Rehman Makki)

भारतातील २००० मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावर हल्ला, २००८ मध्ये रामपूर सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला, मुंबईतील २६/११ चा हल्ला, २०१८ मध्ये श्रीनगरमधील सीआरपीएफ कॅम्पवर आत्मघातकी हल्ला, या मध्ये मक्कीचा हात होता. पाकिस्तान सरकारने मक्कीला १५ मे २०१९ मध्ये अटक करुन लाहोरमध्ये नजर कैदेत ठेवले होते. आज त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

Related posts

Sonia Gandhi: फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड

देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यलढ्यात डॉ मनमोहन सिंग यांचे नाव अजरामर

Manmohan सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा