उंदरानी खाल्ला उड्डाणपूल!

इंदूर : वृत्तसंस्था : उंदरांनी घरातील वस्तू आणि शेतात उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान केल्याचे तुम्ही आतापर्यंत ऐकले असेल; परंतु अशोक नगर जिल्ह्यात सुमारे ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या उड्डाणपुलाचे उंदरांनी नुकसान करण्याचा आरोप पहिल्यांदाच होत आहे. जुना ओव्हर ब्रिज गिळंकृत करण्यात आला आहे. उंदरांच्या चावण्यामुळे उड्डाणपूल खराब झाल्याचा दावा केला जात आहे. (Madhya Pradesh)

सार्वजनिक बांधकाम उंदराने पूल कुरतल्याचा अजब दावा केला आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, अशोक नगरमध्ये ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला उड्डाणपूल खराब झाला होता. अनेक ठिकाणी खड्डेही तयार झाले आहेत. अहवालानुसार दोन दिवसांपूर्वी शहरातील सुमारे ३० वर्षे जुन्या ओव्हर ब्रिजमध्ये उडाणपुलाला मोठा खड्डा दिसला होता आणि काही वेळातच उड्डाणपुलाचे सीसी पूर्णपणे तुटले आणि संपूर्ण पुलाचे मोठ्या खड्ड्यात रूपांतर झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या प्रशासनाला वाहतूक पूर्ववत करण्यासाठी बॅरिकेड्स उभारून वाहतूक पोलिस तैनात करावे लागले.

३० वर्षे जुन्या उड्डाणपुलावर खड्ड्यांमुळे सतत वाहतूक कोंडी होत आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत पूल  महामंडळाचे कार्यकारी अभियंता रवी शर्मा यांच्यांशी त्यांनी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की वर्षानुवर्षे उंदीर आतील माती बाहेर काढून आत पोकळ करत होते. त्यामुळे ओव्हर ब्रिजचा सीसीचा स्लॅब अचानक तुटला. .

Related posts

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव