Prithvi Shaw : पृथ्वी शॉला मुंबई संघातून वगळले

मुंबई : आगामी विजय हजारे ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी आज (दि.१७) जाहीर झालेल्या मुंबई संघातून सलामीवीर पृथ्वी शॉला वगळण्यात आले आहे. २१ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी श्रेयस अय्यरला मुंबईच्या कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले आहे. (Prithvi Shaw)

नुकत्याच झालेल्या सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेचा विजेता ठरलेल्या मुंबई संघामध्ये पृथ्वीचा समावेश होता. तथापि, या स्पर्धेमध्ये त्याला विशेष कामगिरी करता आली नव्हती. वाढलेल्या वजनामुळे त्याच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर त्याला हजारे स्पर्धेसाठी संघातील स्थान गमवावे लागले. या वर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेसाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावामध्येही पृथ्वी कराराविना राहिला होता. दरम्यान, हजारे ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ जाहीर झाल्यानंतर पृथ्वीने इन्स्टाग्राम स्टोरी टाकून संघातून वगळल्याबाबत नापसंती व्यक्त केली आहे. (Prithvi Shaw)

दुसरीकडे, मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या रहाणेने सुट्टीसाठी विनंती केली होती. त्यानुसार, त्याला विश्रांती देण्यात आली. रहाणेने मुश्ताक अली स्पर्धेत ८ सामन्यांत ५ अर्धशतकांसह ४६९ धावा करून मुंबईच्या विजेतेपदामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या अनुपस्थितीत भारताच्या १९ वर्षाखालील संघाचा खेळाडू आयुष म्हात्रे हा मुंबईकडून सलामीला येईल. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हासुद्धा हजारे स्पर्धेमध्ये मुंबईतर्फे खेळेल. त्याच्यासह शिवम दुबे, शार्दुल ठाकूर या भारतीय संघातील खेळाडूंचाही मुंबई संघात समावेश आहे. या स्पर्धेतील मुंबईचा सलामीचा सामना २१ डिसेंबर रोजी कर्नाटकविरुद्ध अहमदाबादमध्ये रंगणार आहे. (Prithvi Shaw)

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत