President Arrests : दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना भल्या पहाटे अटक

President Arrests

सोल (दक्षिण कोरिया) : दक्षिण कोरियाचे विद्यमान अध्यक्ष यून सुक येओल यांना अटक करण्यात आली. पदावर असताना अटक करण्यात आलेले दक्षिण कोरियाचे ते पहिले अध्यक्ष आहेत. पोलिसांना त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासाभोवतील लावण्यात आलेली तारेची बॅरिकेड्स तोडण्यात आली. त्यानंतर यून यांना ताब्यात घेण्यात आले. (President Arrests)

यून यांनी ३ डिसेंबर रोजी मार्शल लॉ लागू केला होता. त्यामुळे देशात अशांतता माजली. या आरोपाखाली त्यांच्यावर संसदेने महाभियोग चालवला आहे. त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्याचा ठराव करण्यात आला आहे. परंतु घटनात्मक न्यायालयाने महाभियोग कायम ठेवला तर त्यांना पदावरून काढून टाकता येणार आहे.

बुधवारी यून यांना नाट्यमयरित्यारित्या अटक केल्यानंतर तपास यंत्रणा आणि अध्यक्षीय सुरक्षा पथकात गेले आठवडाभर सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. यून यांना अटक करण्यासाठी ३ जानेवारी रोजीच भ्रष्टाचार विरोधी कार्यालयातील अधिकारी गेले होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना अटक करता आली नव्हती. (President Arrests)

भल्या पहाटे कारवाई

बुधवारी भल्या पहाटे तपास अधिकारी आणि सशस्त्र पोलिसांचे पथक यून यांच्या सोलमधील निवासस्थाने पोहोचले. त्याच्या प्रवेशद्वार आणि कंपाउंड वॉलवर लावण्यात आलेले काटेरी कुंपण शिडी लावून कटरने तोडण्यात आले. पथकात जवळपास १००० जण होते. त्यांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानापर्यंत पोहोचत त्यांचा ताबा घेतला. काही तासांनंतर, यून यांना अटक केल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले. (President Arrests)

दरम्यान, अटकेच्या आधी जारी केलेल्या तीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, ३४ वर्षीय यून यांनी ते तपासकर्त्यांना पूर्ण सहकार्य करतील, त्यांच्यावरील वॉरंट बेकायदा आहे. अटक बेकायदा असली तरी रक्तपात टाळण्यासाठी मी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे म्हटले आहे.

तपासअधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ चौकशी सुरू केली. यादरम्यान यून शांतपणे उत्तरे देत होते, असे सांगण्यात आले.

दावे-प्रतिदावे

यून यांच्या अटकेबाबत दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. यून यांच्या वकिलांनी ही अटक ‘बेकायदेशीर’ आहे. कारण भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा असलेल्या ‘सीआयओ’कडे यून यांच्यावरील बंडखोरीच्या आरोपांची चौकशी करण्याचा अधिकार नाही. चुकीच्या अधिकारक्षेत्राद्वारे त्यांच्यावर वॉरंट जारी करण्यात आल्याचाही त्यांचा दावा आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालय आणि न्याय मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी अटक वॉरंट कायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

विरोधी डेमोक्रॅटिक पार्टीचे फ्लोअर लीडर पार्क चॅन-डे यांनी, यून यांच्या अटकेमुळे ‘दक्षिण कोरियामध्ये न्याय जिवंत आहे’ हे दिसून आले, असे म्हटले.

ही अटक ‘संवैधानिक सुव्यवस्था, लोकशाही आणि कायद्याचे राज्य पुनर्स्थापित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे,’असे त्यांनी पक्षाच्या बैठकीत सांगितले.

देशाचे सध्या कार्यवाहक अध्यक्ष म्हणून अर्थमंत्री चोई संग-मोक यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. पहिले कार्यवाहक अध्यक्ष, हान डक-सू यांच्यावरही संसदेने महाभियोग चालवल्यानंतर त्यांना सत्तेवर आणण्यात आले. येथे विरोधकांचे मोठे बहुमत आहे. (President Arrests)

हेही वाचा :

भागवतांचे वक्तव्य देशद्रोही

Related posts

Rahul attacks Bhagwat : भागवतांचे वक्तव्य देशद्रोही

Gang Rape : भाजप प्रदेशाध्यक्षावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा

Pawar criticises Shah : ‘त्यांना’ कधी तडीपार केले नव्हते!