प्रशांत किशोर राजकारणात; ‘जनसुराज पक्षा’ची घोषणा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वत:च्या राजकीय पक्षाची घोषणा केली. जनसुराज पक्ष असे या पक्षाचे नाव असेल. बिहारचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी आमचा पक्ष काम करेल, असे किशोर यांनी म्हटले आहे. ‘‘आपल्या सर्वांना बिहारचा आवाज बुलंद करायचा आहे. जेणेकरून ‘बिहारी’ म्हणून आपली कुणीही संभावना करता कामा नये. बिहारी विद्यार्थ्यांना जेथे मारहाण झाली त्या पश्चिम बंगालमध्ये त्याचबरोबर तमिळनाडू, मुंबई आणि दिल्ली येथेही हा आवाज पोहोचला पाहिजे.’’ (Prashant Kishor)

गेल्या २५-३० वर्षांत बिहारच्या जनतेने भाजप आणि लालू प्रसाद यादव यांना साथ दिली. मात्र बिहारच्या जनतेला त्याचा काहीही फायदा झाला नाही. बिहारी जनतेच्या असहायतेचा फायदा घेत हे पक्ष सत्तेवर आले. ही असहायता आता संपवायची आहे, असे किशोर यांनी म्हटले याआधी म्हटले होते.

नितीशकुमारांना केले लक्ष्य

नितीशकुमार हे बिहारचे सरकार चालवण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत, असा घणाघात किशोर यांनी काल, दि. १ रोजी केला होता. एकेकाळी लालू प्रसाद यादव यांना पाठींबा देऊन जी चूक काँग्रेसने केली तीच चूक भाजपने नितीशकुमारांना पाठींबा देऊन केली आहे, असा आरोपही त्यांनी केला. (Prashant Kishor)

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

आयफोन आता ‘देवा’चा झाला !

ख्रिस्ती मिशनरीची हत्या, ओरिसा विधानसभेवरील हल्ला आणि खासदार सारंगी