पंढरपूर दर्शन मंडपासह ‘स्काय वॉक’ आराखड्याला मंजुरी

सोलापूर

पंढरपुरातील विठूरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला दर्शन मंडप आणि स्काय वॉकचा प्रश्न मार्गी लागत आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या १२९ कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी राज्याच्या मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने ११० कोटी रुपये खर्चाचा आराखडा मंजूर केला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.

दर्शन रांगेत भाविकांसाठी पिण्याचे शुद्ध पाणीशौचालयाची सुविधाप्रतीक्षालयदर्शनासाठी टोकन घेण्याची सुविधारिफ्रेशमेंटआपत्तीजनक स्थितीत सुरक्षितपणे बाहेर पडण्याची व्यवस्थाहिरकणी कक्षदिव्यांगासाठी सुविधाअग्निप्रतिबंधक सुविधापोलीस सुरक्षाजेवण व्यवस्थावाहनतळ इत्यादी बाबींचा आराखड्यात समावेश आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीच्या बैठकीत हा आराखडा अंतिम होऊन शासन निर्णय निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंढरपुरात आषाढी, कार्तिकीसह माघी आणि चैत्री वारीला होणारी भाविकांची वाढती गर्दी पाहता सध्याची दर्शनरांग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे दर्शन मंडप व स्काय वॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी प्रशासनाने १२९ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला होता. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीने या आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर हा आराखडा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीत सादर करण्यात आला. या समितीनेही या आराखड्याला मान्यता दिली होती. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने ११० कोटी खर्चाच्या या आराखड्याला मान्यता दिली. पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदस्य असलेल्या राज्य शिखर समितीकडे हा आराखडा सादर केला जाईल. सप्टेंबर महिन्यात राज्य शिखर समितीकडून या आराखड्यास अंतिम मान्यता मिळेल व त्यानंतर लवकरच शासन निर्णय निघेल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

Related posts

Mitra

Mitra : सांगली, कोल्हापुरातील पूर नियंत्रणासाठी साठवण तलाव बांधा

Spine surgery

Spine surgery:  ‘डीवाय’मध्ये मणक्यावरील शस्त्रक्रियेचे शतक

Ambedkar Chair speech

Ambedkar Chair speech: डॉ. बाबासाहेबांचे कार्य राष्ट्र बांधणीसाठी महत्त्वाचे