भाजपच्या मदतीनेच ओमर सत्तेत : राशीद

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी ओमर अब्दुला यांनी शपथ घेतल्यानंतर अवामी इत्तेहाद पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार शेख अब्दुल रशीद उर्फ इंजिनियर रशीद यांनी ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांच्यावर हल्लाबोल केला. (Sheikh Abdul Rashid)

राशिद म्हणाले, की ओमर यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आता आम्हाला आशा आहे की,  त्यांनी त्यांची आश्वासने पूर्ण करावीत. आम्ही केंद्रालाही विनंती करतो. सरकार त्यांना सहकार्य करेल. ओमर कायम जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवण्याचे, कलम ३७० आणि ३५ अ याबाबत बोलत असतात; पण ते ३७० कलमापासून पळून जात आहेत. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द केले, तेव्हा तीन दिवस आधी त्यांनी फारुख अब्दुल्ला यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर फारुख म्हणाले की, काहीही रद्द केले जाणार नाही. यानंतर फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांना गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांनी सर्वांशी चर्चा करून कलम ३७० हटवले, हे एक मॅच फिक्सिंग होते, यात शंका नाही. भाजपच्या मदतीनेच जम्मू-काश्मीरमध्ये ‘नॅशनल कॉन्फरन्स’ सत्तेत आले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी या वेळी केला.

हेही वाचा :

Related posts

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित