कोबी : कोबी बारीक चिरुन किंवा किसून घ्यावा. यात चवीनुसार लाल तिखट मसाला, हळद, मीठ, चाट मसाला, आलं – लसूण पेस्ट घालून कोबीचे एकजीव तयार करून घ्यावे. हे आपण कणकेच्या गोळ्यात भरून पराठा लाटू शकता. किंवा गव्हाचे पीठ यात घालून ते एकत्रित मळून देखील याचे पराठे लाटू शकता. कोबीतील व्हिटॅमिन ‘के’ आणि ‘सी’ आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडांच्या मजबुतीसाठी देखील फायदेशीर ठरते.
पालक : पालक बारीक चिरून तो मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. ती कणकेत मिसळून कणीक व्यवस्थित मळून घ्यावे. या तयार कणकेचे पराठे लाटून भाजून घ्यावेत. पालक पराठा सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी आणखीनच छान लागतो. पालकमध्ये लोह, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट फार मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे हाडे मजबूत होण्याबरोबर डोळे निरोगी राहण्यास मदत होते.
रताळे : रताळी धुवून उकडवून त्याची सालं काढून मॅश करून घ्या. त्यात आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट, मीठ, चाट मसाला, आलं – लसूण पेस्ट घालून रताळ्याचे स्टफिंग तयार करुन घ्या. हे स्टफिंग कणकेच्या गोळ्यात भरून चपातीप्रमाणेच पराठा लाटून घ्यावा. रताळ्याचा पराठा पचायला हलका असतो यासोबतच, त्यात फायबरचे प्रमाण अधिक असल्याने दीर्घकाळासाठी मुलांचे पोट भरलेले राहते.
– स्वयंपाक घरासाठी काही महत्त्वाच्या टिप्स….
- मेथीला मोड आणले आणि ती वेगवेगळ्या पदार्थांत वापरली, तर कडू लागत नाही आणि फायदाही होतो.
- कुठल्याही पालेभाज्या शिजवण्यापूर्वी त्यांत चिमूटभर मीठ टाकले व दोन थेंब लिंबाचा रस टाकला तर त्या छान हिरव्यागार राहातात…!!!
- पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांची हमखास साथ येते. अशावेळी पाणी नेहमी उकळून प्यावे. तसेच अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा मध असे मिश्रण दिवसातून २-३ वेळा घ्यावे. यामुळे लवकर आराम पडतो…!!!
- डोसा कुरकुरीत (क्रिस्पी) होण्यासाठी डोशाचे पीठ भिजवतेवेळी तांदळात १ चमचा साबुदाणा व एक चमचा हरभर्यामची (चण्याची) डाळ व थोडेसे मेथीचे दाणे घालावेत , म्हणजे डोसे छान , मस्त कुरकुरीत होतात आणि इडल्या साठी पीठ भिजवतेवेळी तांदळात थोडे मेथीचे दाणे घालावे, म्हणजे इडल्या छान हलक्या व मऊ होतात…!!!
- साबुदाण्याची खिचडी करताना भिजवायच्या आधी साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा. गार झाल्यावर मग भिजवून ठेवावा. तो नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडीपण मऊ, मोकळी होते. शिवाय भाजल्यामुळे खिचडी पचायलापण हलकी होते…!!!
- ब्रेडक्रंप्स असेच बनवले तर ते मऊ होतात, त्यापेक्षा ब्रेड आधी ओव्हन मधे घालून कडक करावेत आणि मग ब्रेडक्रम्प्स बनवावेत. बाहेरच्यासारखे कुरकुरीत होतात…!!!
- चीज किसताना किसणीला थोडे तेल लावावे. त्यामुळे चीज किसणीला न चिकटता छान किसले जाते…!!!
- कुकरची रबरी रींग फ्रिजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रिजरमधे १५ मिनिटे ठेवावी, यामुळे रींग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते…!!!
- लसूण सोलून चमचाभर तेलात वाटून ठेवला की आठवडाभर सुद्धा ही पेस्ट फ्रिज मधे ठेवल्यास चांगली टिकते…!!!
- आल्याचे वरचे साल काढून टाकून मग त्याचे तुकडे कराव त्यांना किंचित मीठ लावून मग त्यांची पेस्ट करुन फ्रिजमधे ठेवल्यास आठवडाभर छान टिकते…!!!
- हिरव्या मिरच्यांचा ठेचा करताना त्यात थोडा लिंबाचा रस व मीठ घालून ठेवल्यास आठवडाभर उत्तम टिकतो…!!!
- टोमॅटो प्यूरीसाठी निवडक चांगल्या प्रतीचे लालभडक टणक टोमॅटो घेउन ते गॅसवर पांच मिनीटे उकळत्या पाण्यात ठेवा.थंड झाल्यावर सालं काढून मिक्सर मधे प्युरी करून घ्या. या प्युरीत थोडे व्हिनेगर घालून फ्रिज मधे ठेवावे. ७-८ दि…
- रव्याचे लाडू लवकर तयार व्हायला हवे असतील तर दोनतारी पाक करावा त्यामुळे दोन तासातच लाडू वळता येतात.रव्याचा लाडू खरखरीत व किंचित बसका हवा. त्यासाठी रवा जाडसर वापरावा…!!!