टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  दिवंगत उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधीकारी म्हणून नोएल टाटा (Noel Tata) यांची निवड टाटा ट्रस्टतर्फे (Tata Trust) करण्यात आली. टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नोएल यांच्याकडे सोपवण्यात आली असून टाटा ट्रस्टच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत या निवडीबाबतचा निर्णय झाला.

Noel Tata : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नोएल यांच्याकडे

 ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्यानंतर त्यांचा वारसदार कोण? अशी चर्चा यापुर्वी अनेकदा रंगत असे. रतन टाटा हे अविवाहीत असल्यामुळे वारसदार म्हणून टाटा घराण्यातील काही नावे चर्चेत होती. नोएल हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ होत. ते यापुर्वीपासून सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. नोएल यांचे नाव टाटा समूहाचे वारसदार म्हणून आघाडीवरच होतं. ते सध्या ट्रेंट लिमिटेड आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे टाटा सन्सची ६६ टक्के मालकी आहे. तसेच ते टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक, टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे उपाध्यक्ष आहे. नोएल यांचे शिक्षण विदेशात झाले. त्यांनी यूकेच्या ससेक्स विद्यापीठातून पदवी घेतली  व त्यानंतर फ्रान्सच्या आयएनएसईएडी बिझनेस स्कूलमधूनही शिक्षण घेतले आहे. नोएल यांचा टाटा सन्समधील सर्वात मोठे भागधारक पालोनजी मिस्त्री यांची मुलगी आलू मिस्त्री यांच्याशी विवाह झाला आहे. टाटा यांच्या एकूण उत्पन्नामधील ६६ टक्के भाग हा टाटा ट्रस्ट व टाटा ग्रुपअंतर्गत कंपन्यांमधून येतो. टाटा ट्रस्ट हे टाटा सन्सचा भाग असून आजपर्यत टाटा ट्रस्टने देशाच्या सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.

नवल टाटांचेच पुत्र नोएल

नोएल टाटा (Noel Tata) हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटांचे वडील नवल टाटा यांचे पहिले लग्न सुनी कमिश्रिएट यांच्याशी झाले होते. त्यांच्यापासून त्यांना रतन आणि जिमी अशी दोन मुले झाली. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर नवल टाटा यांनी 1955 मध्ये स्विस उद्योगपती सिमोनशी लग्न केले. सिमोन व नवल यांना नोएल हा मुलगा झाला.

हेही वाचा

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

आयफोन आता ‘देवा’चा झाला !

ख्रिस्ती मिशनरीची हत्या, ओरिसा विधानसभेवरील हल्ला आणि खासदार सारंगी