न्यू यॉर्क ते लंडन एका तासात?

वॉशिंग्टन : न्यूयॉर्क ते लंडन अंतर एका तासात पार करणाऱ्या ट्रान्सअटलांटिक बोगद्याची महत्त्वाकांक्षी कल्पना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एलन मस्क यांच्या ताज्या विधानामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. त्यांची द बोरिंग कंपनी २० अब्ज डॉलर्समध्ये बोगद्याचा हा प्रकल्प उभारू शकते, असा दावा मस्क यांनी केला आहे. (Elon Musk)

गेल्या अनेक दशकांपासून या संकल्पनेची चर्चा सुरू आहे. त्यात अटलांटिक महासागराखाली ३,००० मैल (४,८०० किलोमीटर) लांबीच्या बोगदा बांधण्याचा समावेश आहे. अशा प्रकल्पाचा प्रचंड खर्च, तांत्रिक आव्हाने आणि त्यासाठी आवश्यक अभियांत्रिकी कौशल्याचा अभाव किंवा अचूकतेचा अभाव यामुळे हा प्रकल्प अव्यवहार्य मानला गेला होता. तथापि, मस्क यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टीकोनातून आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे या अभूतपूर्व पायाभूत सुविधा प्रकल्पाबद्दल जागतिकस्तरावर आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

ट्रान्सअटलांटिक बोगद्याची कल्पना नवीन नाही. अभियंते आणि भविष्याचा वेध घेणाऱ्यांसाठी ती फार पूर्वीपासून आकर्षणाचा विषय आहे. प्रस्तावित डिझाईन्समध्ये विशेषत: अटलांटिक महासागराखाली बोगद्याची संकल्पना करण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिका आणि लंडनदरम्यान  हाय-स्पीड रेल्वे प्रवासाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात यश आले तर ते जागतिक दळणवळण आणि लॉजिस्टिक्समध्ये मोठा बदल घडेल. सध्या, लंडन आणि न्यूयॉर्क दरम्यानच्या विमान प्रवासाला अंदाजे आठ तास लागतात. हा प्रवास वेळ एका तासापेक्षा कमी करण्यात सैद्धांतिकदृष्ट्या सक्षम असलेला ट्रान्सअटलांटिक बोगदा दळणवळणाच्या इतिहासात क्रांतिकारी पाऊल ठरेल. (Elon Musk)

एलन मस्क टेस्ला, स्पेसएक्स आणि द बोरिंग कंपनीचे सीईओ आहेत. अत्यंत धाडसी आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी ते ओळखले जातात. मस्कनी नुकताच बोरिंग कंपनींच्या माध्यमातून केवळ २० अब्ज डॉलर्समध्ये ट्रान्सअटलांटिक बोगदा पूर्ण करू शकते, असा दावा केला. त्यांच्या या वक्तव्याकडे जगाचे लक्ष वेधले गेले. कारण खर्चाचा हा अंदाज आधी अंदाजांच्या केवळ एक अंश आहे. हायपरलूप संकल्पना आणि टनेलिंग तंत्रज्ञानामुळे मस्क यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. हायपरलूमुळे लांब पल्ल्याचा प्रवास आणि दळणवळणा क्षेत्रांत क्रांती घडणार आहे. त्यामुळे ट्रान्सअटलांटिक बोगद्याच्या संकल्पनेकडे जगाचे लक्ष वेधले आहे.

नवीन टनेलिंग तंत्र, ऑटोमेशन आणि स्केलेबिलिटीच्या माध्यमातून खर्चात कपात होईल, असे मस्क यांचे मत आहे. लास वेगास कन्व्हेन्शन सेंटर लूपसारख्या छोट्या प्रकल्पाच्या माध्यमातून बोरिंग कंपनीने कमी खर्चात बोगदे बांधण्याची संकल्पना यापूर्वीच सिद्ध केली आहे. तथापि, ट्रान्सअटलांटिक बोगद्याची भव्यता लक्षात घेता या प्रकल्पासमोर अभूतपूर्व आव्हाने असणार आहेत. (Elon Musk)

प्रकल्पाचा मध्यवर्ती भाग म्हणजे हायपरलूप तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण. ही संकल्पना त्यांनी २०१३ मध्ये मांडली. याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा प्रकल्प यशस्वी होऊ शकतो, असा मस्क यांचा दावा आहे.

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले