ट्रम्प यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल मोदींची खास पोस्ट

नवी दिल्ली : ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत बहुमताने विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक विजयासाठी ट्रम्प यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांना शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. अटीतटीच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच जोरदार मुसंडी घेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर विजयी आघाडी घेतली. (Narendra Modi)

मोदी यांनी आपल्या खास मित्राचे अभिनंदन केले आहे. मोदींनी एक्स अकाऊंटवरून शुभेच्छा देत ट्रम्प यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहे. ट्रम्प यांना शुभेच्छा देताना मोदी म्हणाले की, ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचे हार्दिक अभिनंदन. आपण लोकांच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी एकत्र काम करू या.

निवडणुकीतील विजयाबद्दल मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे हार्दिक अभिनंदन. भारत-अमेरिका यांच्यातील व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी आपल्या सहकार्याने नवीन गोष्टी करण्यास मी उत्सुक आहे, असेही मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

२०२० साली झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा  ज्यो बायडन यांनी पराभूत केले होते. यानंतर ट्रम्प यांनी यंदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. तसेच  त्यांनी आक्रमक प्रचार करत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीही मिळवली होती. त्यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस यांनी आव्हान उभे केले होते. मात्र अटीतटीची मानली जाणारी ही अध्यक्षीय निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली. (Narendra Modi)

हेही वाचा :

Related posts

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित