Rankala lake : रंकाळा तलावात म्युझिकल फाउंटन उभारणार : राजेश क्षीरसागर

Rankala lake

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूरचा क्विन नेकलेस म्हणून ओळख असलेल्या रंकाळा तलावाचे (Rankala lake) सौंदर्य आणखीन खुलणार आहे. रंकाळा तलावाच्या मध्यभागी म्युझिकल फाउंटन उभारण्यात येणार आहे. या फाउंटनसाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामाची टेंडर प्रकिया सुरू झाली असल्याने २०२५ या नववर्षात रंकाळा तलावातील फाउंटन पर्यटकांना खुला होणार आहे.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे  यांनी रंकाळा तलावात म्युझिकल फाउंटन उभारण्यासाठी पाच कोटी निधीस मंजुरी दिली आहे.  रंकाळा तलावाच्या मध्यभागी ५० मीटर परिघाचा आकर्षक विद्युत रोषणाई ध्वनीप्रणालीसह पाण्यात कारंजे बसवण्यात येणार आहे. कोल्हापूरची चौपाटी, कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रंकाळा तलावाच्या संवर्धन आणि सुशोभिकरणासाठी तीन वर्षात २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुलभूत सुविधा अंतर्गत पहिल्या टप्प्यातील ९ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून कामास सुरुवात झाली असून ती कामे प्रगतीपथावर आहेत. पर्यटन विभागाने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता विरुंगुळा उद्यान साकारण्यासाठी ४ कोटी ८० लाख, रंकाळा तलावासभोवती विद्युत रोषणाई करण्यासाठी साडेतीन कोटी, जिल्हा नियोजन समितीतून मिनिचर पार्क करण्यासाठी अडीच कोटी निधी या पूर्वीच मंजूर झाले आहेत. (Rankala lake)

हेही वाचा :

Related posts

ताठ कण्याच्या विदुषी : रोमिला थापर

विहिरीत पडलेला माणूस

लाडकी बहीण योजनेचा खरा परिणाम