फटाके फोडल्याच्या भांडणात खून

तासगाव; प्रतिनिधी : तासगाव तालुक्यातील येळावी येथे घरासमोर फटाके फोडण्याच्या  कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसान भांडणात झाले. यानंतर एका युवकांवर सख्या दोघा भावांनी धारधार शस्त्राने वार करून खून केला.

हा खून पुर्व वैमनस्यातून झाल्याचा पोलीसांचा संशय असून याप्रकरणी संशयित दोघा भावांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. दिपावली पाडव्याच्या शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास येळावी येथे ही घटना घडली. दिपक जयसिंग सुवासे (वय – 26) असे मयत युवकाचे नाव असून संशियित विश्वजीत राजेंद्र मोहिते (वय -19) व इंद्रजीत राजेंद्र मोहिते (वय – 20) या दोघा भावांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले धारदार शस्त्र ही पोलिसांनी जप्त केले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ‘येळावी येथील जुना धनगाव रस्त्यालगत मयत दिपक सुवासे यांच्या शेजारी मोहिते बंधू राहतात. सुवासे व मोहिते या दोन्ही कुटुंबात गेल्या काही वर्षांपासून जमीन, गटारीचे पाणी दारातून जाणे या कारणांवरून वाद होता. याच वादातून  अनेक वेळा वादावादीचे आणि भांडणाचे प्रकार घडले आहेत. शनिवारी दिपावली पाडव्याच्या दिवशी रात्री साडे आठच्या सुमारास इंद्रजित व विश्वजित हे दोघे रस्त्यावर फटाके फोडत होते. त्यावेळी दिपक याने ‘आमच्या घरी लहान बाळ आहे, त्याला फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होतो, तुम्ही अन्यत्र फटाके फोडा’ असे सांगण्यासाठी गेला होता. त्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले. रागाच्या भरात विश्वजित व इंद्रजित यांनी दिपकवर धारधार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात दिपक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मिरज येथे दवाखान्यात दाखल कारण्यात आले पण उपचारादरम्यान दिपकचा मृत्यू झाला.  याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इंद्रजित  मोहिते व विश्वजीत मोहिते या दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एन.काबुगडे करीत आहेत.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी