murder: शीर नसलेले धड सापडले; त्याचदिवशी मुख्य आरोपीचा खून

murder

कोल्हापूर : प्रतिनिधी : हुतात्मा पार्क येथील जयंती नाल्यात गाळ काढताना शीर नसलेले धड सापडले. अंगावर फक्त बनियन आणि चड्डी, शीर सापडलेच नाही. मृतदेहाची ओळख पटवताना पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यास सुरु झाली. एका बेपत्ता व्यक्तीची आणि सापडलेले धड नसलेले शरीरात साम्य होते. पोलिसांनी मृतदेहाची डीएनए चाचणी केली. मृतदेहाची ओळख पटली पण शिर सापडले नाही.  शवविच्छेदनात धडापासून शिर शार्प कट म्हणजेच धारदार शस्त्राने शीर कापल्याचा अहवाल आल्यानंतर पोलिसांकडून खूनाचा तपास सुरु असताना एक गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी पाच संशयितांकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी  खून केल्याची कबुली दिली. पण ज्यादिवशी शीर नसलेले धड सापडले होते त्याच दिवशी मुख्य आरोपीचा रंकाळा चौपाटीवर खून झाल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आले. चक्रावून टाकणाऱ्या या खूनाचा तपास कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्याने अक्षरश: खणून काढला.

कोणातही सबळ पुरावा नसताना केवळ तांत्रिक माहिती आधार, शवविच्छेदनाचा अहवाल आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहिती आधारे तपास करत पोलिसांनी यशस्वी तपास केला. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अजय उर्फ रावण दगडू शिंदे (डवरी वसाहत, यादवनगर, कोल्हापूर) याने कट रचला होता. पण ज्यादिवशी धड नसलेले शिर सापडले त्याच दिवशी रंकाळा चौपाटीवर त्याचा खून झाल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी आव्हानात्मक ठरलेल्या गुन्ह्याचा उलगडा करून दोन सराईतांसह तीन अल्पवयीन संशयितांना अटक केली. रंकाळा तलाव परिसरात खून झालेल्या अजय ऊर्फ रावण दगडू शिदे (डवरी वसाहत, यादवनगर) यानेच खुनाचा कट रचल्याचेही चौकशीतून निष्पन्न झाले आहे. अभिषेक मंजुनाथ माळी (वय २०), अतुल सुभाष शिंदे (२३, रा. डवरी वसाहत, यादवनगर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याशिवाय तीन अल्पवयीन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. हुतात्मा पार्कमध्ये खून झालेली व्यक्ती शाहूवाडी तालुक्यातील पिशवी येथील असून अशोक बाबूराव पाटील (४५) असे त्यांचे नाव होते. ते वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होते.

जयंती नाल्यात सापडला मृतदेह

शहरातील हुतात्मा पार्कजवळ असलेल्या जयंती नाल्याची जेसीबी मशिनद्वारे साफसफाई आणि गाळ काढता चार एप्रिल २०२४ रोजी शीर नसलेले पुरुष जातीचे धड सापडले होते.  पोलिसांनी जयंती नाला आणि परिसरात शीर शोधण्याचा प्रयत्न केला पण ते मिळून आले नाही.  जुना राजवाडा पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणमार्फत तपास सुरू होता.

धडावर शार्प कट चा अहवाल

शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये शार्प कट, असा अभिप्राय आल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचा तपासाधिकार्‍यांचा प्राथमिक निष्कर्ष होता. जुना राजवाडा पोलिसांनी मृतदेहाचा ओळख पटवण्यासाठी कसून तपास केला. जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तीचा तपास करत असताना शाहूवाडी तालुक्यातील पिशवी गावच्या एका व्यक्तीच्या शरीराची ठेवण आणि शीर नसलेल्या धडाचा मृतदेह मिळतीजुळती असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबची मदत करुन मृतदेहाची डीएनए चाचणी केली असता शीर नसलेला मृतदेह शिवाजी पाटील यांचा असल्याचे तपासात निष्पण्ण झाले.

किरकोळ वादातून खून झाल्याची माहिती पुढे

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी खुनाच्यादृष्टीने तपास सुरू करुन ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या हुतात्मा पार्कवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. हुतात्मा पार्कमध्ये यादवनगरमधील रावण गँगने एका व्यक्तीचा खून केल्याची माहिती हवालदार परशुराम गुजरे आणि वैभव पाटील यांना मिळाली. त्यांना संशयितांची नावे मिळाली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अजय उर्फ रावण शिंदे याचा मेव्हुणा अभिषेक माळी आणि अतुल शिंदे आणि ते त्यांचे अन्य साथीदार, रत्नागिरी, कळंबा, यादव नगर येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण नंतर त्यांनी खुनाची कबुली दिली.

धड सापडले त्याच दिवशी मुख्य आरोपीचा रंकाळावर खून

जयंती नाल्यात ज्यादिवशी  धड मिळून आले, त्याच दिवशी म्हणजे चार  एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी मुख्य संशयित रावण ऊर्फ अजय शिंदे याचा रंकाळा परिसरात टोळी युध्दातून खून झाला होता. रावण टोळीच्या विरोधातील एका टोळी अजय शिंदे याला रंकाळ्यावर बोलावून त्याचा खून केला होता.

असा झाला अशोक पाटील यांचा खून

ज्या दिवशी शीर नसलेले धड सापडले त्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर हुतात्मा पार्क येथे रावण टोळीने अशोक पाटील यांचा खून केला होता. अशोक पाटील हे शहरातील हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होते. त्या दिवशी सुट्टी असल्याने ते रात्री हुतात्मा पार्क मध्ये फिरायला गेले होते. यावेळी त्यांचा हुतात्मा पार्कमध्ये अभिषेक माळी यांच्याशी वाद झाला. अभिषेकने अजय शिंदे, अतुल जोशी, सुरज माळी, ओंकार माने यांना गार्डनमध्ये बोलावून घेतले. सर्व साथीदार आल्यानंतर त्यांनी अशोक पाटीलवर एडक्याने एका पाठोपाठ खोलवर वार केले. वर्मी हल्ल्यात अशोक पाटील ठार झाल्यानंतर त्याच्या अंगावरील कपडे उतरविण्यात आले. एडक्याने त्याचे मुंडके तोडण्यात आले. मुंडके नसलेले धड जयंती नाल्यात फेकून देण्यात आले तर शिर काही अंतरावर नाल्याच्या कडेला गाळात पुरून टाकून पुरावा नष्ट करण्यात आल्याची संशयिताने कबुली दिली आहे.

हेही वाचा :

कारमध्ये सापडले घबाड

उर्मिला कोठारेच्या कारची धडक; मजुराचा मृत्यू

Related posts

Lucknow Murder Case : ते बहिणींना विकणार होते, म्हणून मीच…!

Ghatkopar Hording: अर्शद खानला अटक

three drown: वकिलासह तिघांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू