Mumbai Cricket : मुंबई अंतिम फेरीत

बेंगळुरू : मुंबई संघाने शुक्रवारी सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली. अजिंक्य रहाणेने ठोकलेल्या ९८ धावांच्या जोरावर मुंबईने उपांत्य सामन्यात बडोदा संघावर ६ विकेटनी मात केली. (Mumbai Cricket)

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या मुंबईने बडोद्याला ७ बाद १५८ धावांत रोखले. बडोद्याच्या एकाही खेळाडूला अर्धशतक झळकावता आले नाही. बडोद्याच्या शिवालिक शर्माने २४ चेंडूंमध्ये प्रत्येकी २ चौकार व षटकारांसह नाबाद ३६ धावा केल्या. मुंबईकडून सूर्यांश शेडगेने २ विकेट घेतल्या. (Mumbai Cricket)

बडोद्याच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ केवळ ८ धावांवर परतला. त्यानंतर, रहाणे आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी रचली. अय्यर ३० चेंडूंमध्ये ४ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावा करून बाद झाला. त्यानंतरही, रहाणेने फटकेबाजी सुरू ठेवली. सलग तिसरे अर्धशतक झळकावणाऱ्या रहाणेने ५६ चेंडूंमध्ये ९८ धावा करताना ११ चौकार व ५ षटकार लगावले. यादरम्यान, रहाणेने मुंबईतर्फे टी-२०मध्ये सर्वाधिक १२ वेळा ५० हून अधिक धावांचा विक्रमही स्वत:च्या नावे केला. त्याने मुंबईकडून ११ वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरला मागे टाकले. मुंबईला जिंकण्यासाठी एक धाव हवी असताना रहाणे बाद झाला. त्याचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. पुढच्याच षटकात सूर्यकुमार यादवही बाद झाल्यावर सूर्यांश शेडगेने षटकार खेचून मुंबईचा विजय निश्चित केला. (Mumbai Cricket)

हेही वाचा :

बुद्धीबळाच्या पटावरचा नवीन ‘राजा’

रहाणेची बॅट तळपली

https://www.espncricinfo.com/series/syed-mushtaq-ali-trophy-2024-25-1445827/baroda-vs-mumbai-1st-semi-final-1446105/full-scorecard

 

Related posts

Indian women’s win : भारताचा मोठा विजय

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’