Home » Blog » भाजपच्या गुंडगिरीच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसची मंत्रालयावर निदर्शने

भाजपच्या गुंडगिरीच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसची मंत्रालयावर निदर्शने

अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी

by प्रतिनिधी
0 comments
Mumbai Congress

मुंबई; विशेष प्रतिनिधी : भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (दि.२०) युवक काँग्रेसच्यावतीने मंत्रालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी जय भीमच्या घोषणांनी मंत्रालय परिसर दणाणून गेला होता. (Mumbai Congress)

भाजपच्या युवा मोर्चाच्या सुमारे ४० कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि.१९) मुंबई काँग्रेस कार्यालयावर भीषण हल्ला केला. काठ्या, पेव्हर ब्लॉकने हल्ला करत कार्यालयाची तोडफोड केली. काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना घेरून विनयभंग करत बेदम मारहाण केली. या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसच्यावतीने मंत्रालयावर निदर्शने करण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या अमित शाहांचा धिक्कार… अमित शहा इस्तिफा दो… भाजपची गुंडगिरी बंद करा… बीड-परभणी प्रकरणातील दोषींवर कारवाई करा… सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळायलाच हवा, अशा घोषणा देत मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते मंत्रालयाच्या गेटवर धडकले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी सुरू केली आहे. मात्र अशा भेकड हल्ल्यांनी काँग्रेसचे कार्यकर्ते डगमगणार नाहीत. भाजपच्या हिंसेला संविधानिक मार्गाने ठोस उत्तर देवू. कार्यकर्त्यांनी आता निर्धार केला आहे, असे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते यांनी सांगितले. पोलिसांनी या आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घेवून आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले. (Mumbai Congress)

मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष व संघटन प्रभारी प्रणिल नायर, कोषाध्यक्ष संदीप शुक्ला, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष कचरू यादव, महेंद्र मुणगेकर, अशोक सुत्राळे, अजंता यादव, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव, प्रद्युम्न यादव, नीती महाडीक, किशोर सिंग, बाळा सरोदे, इव्हन डिसूझा, यांच्यासह कार्यकर्त्यांना निदर्शने करताना अटक करण्यात आली.

 

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00