Home » Blog » Fonde : फोंडेंवरील निलंबन मागे घ्या, अन्यथा संप  

Fonde : फोंडेंवरील निलंबन मागे घ्या, अन्यथा संप  

महानगरपालिकेवर मोर्चा

by प्रतिनिधी
0 comments
Fonde

कोल्हापूर : प्रतिनिधी : महानगरपालिकेकडील सहायक शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, या मागणीसाठी गुरुवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. निलंबनाची कारवाई रद्द केली नाही तर शिक्षक संपावर जातील, असा इशारा यावेळी देण्यात आला. इंडिया आघाडी, शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, कामगार कृती समिती दारूबंदी संघर्ष समिती व विद्यार्थी संघटना यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले होते. (Fonde)

चार एप्रिल रोजी शक्तीपीठ महामार्ग आंदोलनात सक्रीय सहभाग आणि  कर्जमाफीसाठी एकनाथ शिंदे आंदोलनाच्या इशारा दिल्यामुळे सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.  फोंडे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी यासाठी सर्व संघटनांच्या वतीनं आज  गुरुवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. (Fonde)

मोर्चाला मार्गदर्शन करताना  माजी आमदार संपत बापू पाटील यांनी, ही सरळ सरळ हुकूमशाही असून याविरोध एकजुटीनं लढलं पाहिजे, असं आवाहन केलं. शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलन दडपण्याचा या सरकारचा डाव आहे, या निलंबनाच्या कारवाईवरून त्यांचे मनसुबे स्पष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं. भवानी मंडपातून मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये इंडिया आघाडीत घटक पक्ष, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कामगार संघटना कृती समिती, दारूबंदी संघर्ष समिती, विद्यार्थी संघटना कृती समिती यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. (Fonde)

 ‘शक्तिपीठ महामार्ग रद्द करा’, ‘शेती वाचवा, देश वाचवा’. असं आशय लिहिलेल्या टोप्या परिधान करून शेकडो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे अशा टोप्या शिक्षकांनी देखील घातल्या होत्या. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं. फोंडे यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द झाली नाही तर महापालिकेचे शिक्षक संपावर जातील असा इशारा यावेळी देण्यात आला. (Fonde)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी, शक्त्तीपीठ महामार्ग मागे पन्नास हजार कोटी हडपण्याचा सरकारचा डाव असल्याचे आरोप  केला.  फोंडे यांच्यावर निलंबन कारवाई म्हणजे दडपशाही असून, जर कारवाई मागे घेतली नाही तर सरकारला याची किंमत मोजावी लागेल अशा इशारा यावेळी त्यांनी दिला. (Fonde)

विजय देवणे म्हणाले,” शिक्षक हे देखील नागरिक आहेत.  त्यांना भारतीय संविधान लागू आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना देखील आहे. आयुक्तांना मंत्र्यांच्या आदेशावर आंधळा कारभार करणे चालू ठेवल्यास त्यांच्या बदलीची मागणी करू असे ठणकावून सांगितले. शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड म्हणाले,” आज गिरीश फोंडे यांच्यावर कारवाई करत उद्या कोणी शिक्षक काही बोलला तर त्यांच्यावर कारवाईचा सपाटा सरकार लावेल. निलंबन मागे न घेतल्यास शिक्षक संपावर जातील. (Fonde)

            मोर्चात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, अनिल लवेकर, डॉ. सुनीलकुमार लवटे, भरत रसाळे, चंद्रकांत यादव, सुभाष जाधव, दिलीप पवार, अतुल दिघे, सतीशचंद्र कांबळे, दिगंबर लोहार, उदय नारकर, रघुनाथ कांबळे, कादर मलबारी, प्रभाकर आरडे, आपचे उत्तम पाटील, सीमा पाटील, अनिल लवेकर, बाबासाहेब देवकर यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.  (Fonde)

हेही वाचा :

मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही

पाहुणा बनून मंगलकार्यालयात चोरी करायचा

लाच घेताना मुख्याध्यापक जाळ्यात

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00