Home » Blog » Congress’s agitation : मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही

Congress’s agitation : मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही

रमेश चेन्नीथला यांचा इशारा; ईडीच्या कारवाई विरोधात दुसऱ्या दिवशीही निदर्शने

by प्रतिनिधी
0 comments
Congress’s agitation

मुंबई : विशेष प्रतिनिधी : केंद्रातील तानाशाही मोदी सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षांना संपवू पहात आहे, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई राजकीय हेतूने केली आहे. मोदी-शाह अशा कारवाया करून काँग्रेस पक्षाला संपवू शकत नाहीत आणि अशा कारवायांनी काँग्रेसचे मनोधैर्य तसूभरही खचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी  केले.(Congress’s agitation)

केंद्राच्या ईडीच्या गैरवापराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थिती आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील इंडिया बुल्सजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, काँग्रेसे वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. रजनीताई पाटील, खा. प्रणिती शिंदे,  खा. श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री अॅड. यशमोती ठाकूर, शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, डॉ. विश्वजीत कदम, खा. डॉ. कल्याण काळे, खा. रविंद्र चव्हाण, खा. नामदेव किरसान, खा. बळवंत वानखेडे, खा. डॉ. शोभा बच्छाव, खा. डॉ. शिवाजी काळगे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Congress’s agitation)

आंदोलनानंतर पत्रकार परिषदेत बोलताना चेन्नीथला म्हणाले की, मोदी सरकारने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा आम्ही निषेध करतो. जनतेत या कारवाईबद्दल तीव्र रोष आहे. काँग्रेस पक्षाने या दडपशाही विरोधात सलग दोन दिवस देशभर आंदोलन केले. मोदी- शाह यांच्या सरकार विरोधात यापुढेही काँग्रेस पक्ष मजबूतीने लढा देईल, असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी दिला.

महाबळेश्वरला काँग्रेसचे शिबि

राज्यातील युती सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन विसरले असून आता फक्त ५०० रुपयेच दिले जात आहेत. महायुतीने केवळ मतांसाठी योजना आणली होती. महायुती लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे, हे काँग्रेसने आधीच सांगितले होते. प्रदेश व जिल्हा स्तरावरील कार्यकारिणीची पुनर्रचना लवकरच केली जाईल. महाबळेश्वर येथे काँग्रेस पक्षाचे एक शिबिर आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती चेन्नीथला यांनी दिली. (Congress’s agitation)

खासदार, ज्येष्ठ नेत्यांची बैठक

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत व प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी  काँग्रेस पक्षाच्या खासदारांची व ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. संवाद, समन्वय रणनीती यावर बैठकीत चर्चा झाली. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांवर सभागृहात व सभागृहाबाहेर आवाज उठवणे आणि जनतेचे मुद्दे उपस्थित करण्यावर सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती  प्रदेशाध्यक्ष  सपकाळ यांनी दिली. 

याज्ज्ञवल्क्य जिचकार यांची घरवापसी काँग्रेस पक्षाचे  दिवंगत ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ज्ञवल्क्य जिचकार यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला. निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ती मागे घेऊन त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते धनंजय शिंदे यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

हेही वाचा :
मुस्लिमेतरांना तूर्त ‘वक्फ’वर नियुक्त करणार नाही
देशव्यापी संपर्कसूत्रासाठी हिंदी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00