Home » Blog » Raj thackray warns: महाराष्ट्राचे ‘हिंदीकरण’ खपवून घेणार नाही

Raj thackray warns: महाराष्ट्राचे ‘हिंदीकरण’ खपवून घेणार नाही

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा इशारा

by प्रतिनिधी
0 comments
Raj thackray warns

मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखड्यात महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. त्याला शिक्षणक्षेत्रांसह अन्य क्षेत्रांतूनही तीव्र विरोध होत आहे. आता मनसेनेही या धोरणावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.(Raj thackray warns)

हिंदी भाषेच्या सक्तीतून महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.

केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्राचा समावेश आहे. त्यानुसार महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पहिलीपासून या भाषेच्या सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार राज्यात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य केली आहे. (Raj thackray warns)

त्याला तीव्र आक्षेप घेताना राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. आज भाषा सक्ती होत आहे, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील. दुःख म्हातारी मेल्याचे नाही पण काळ सोकावतो, अशा शब्दांत त्यांनी या धोरणाला विरोध केला आहे. (Raj thackray warns)

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात, राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. सरकारचे सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.

दुसऱ्या प्रांताची भाषा आमच्यावर का लादता?
हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात पहिलीपासून का म्हणून शिकायची? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे, ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा येथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झाले आहेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

हेही वाचा :
मुस्लिमेतरांना तूर्त ‘वक्फ’वर नियुक्त करणार नाही
उर्दूचा उगम भारतातच

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00