Thief arrested : एका वर्षांत चोरल्या ११ दुचाकी

कोल्हापूर : प्रतिनिधी : इस्लामपूरच्या चोरट्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात बारा मोटारसायकल चोरल्या. पोलिसांनी त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या. या चोरट्याने १२ पैकी ११ गाड्या २०२४ या एका वर्षात चोरल्या आहेत. दीपक पांडुरंग वाघमारे (वय ३१,रा. चिकुर्डे, ता. वाळवा, सध्या रा. शिरटेकर चाळ, इस्लामपूर, जिल्हा सांगली) असे या चोरट्याचे नाव आहे. ( Thief arrested)

शहर आणि ग्रामीण भागात वाहनचोरीच्या मोठ्या संख्येने घटना घडत असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पोलिस उप निरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. सांगली जिल्ह्यातील दीपक पांडुरंग वाघमारे हा चोरीची मोटरसायकल घेऊन हातकणंगले तालुक्यातील रामनगर येथे येणार असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी (दि.१३) सापळा रचून वाघमारेला मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याच्याकडे असलेली मोटारसायकल चोरीची असून त्याने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने १२ मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. ( Thief arrested)

कोल्हापूर जिल्ह्यात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात हद्दीत दोन हिरो स्पलेंडर, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून हिरो पॅशन, कोडोलीतून स्प्लेंडर, हातकणंगलेतून होंडा शाईन मोटार सायकल चोरली आहे. सांगली जिल्ह्यात शिराळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिरो एच.एफ.डिलक्स, इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्प्लेंडर चोरली आहे. कराड पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्प्लेंडर, होंडा शाईन, होंडा युनिकॉर्न, हिरो एच.एफ, डिलक्स तर सातारा शहरातून होंडा ॲक्टिव्हा मोपेड चोरल्याची कबुली दिली. दीपक वाघमोरे हा रेकॉर्डवरील चोरटा आहे.( Thief arrested)

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली उप निरीक्षक शेष मोरे, पोलिस अंमलदार सुरेश पाटील, रोहित मर्दाने, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, रुपेश माने, संजय पडवळ, युवराज पाटील, अमित सर्जे, राजेंद्र वरंडेकर, सायबर पोलिस ठाण्याकडील सुहास पाटील यांचा तपासात सहभाग होता.

हेही वाचा :

ईडीच्या छाप्यानंतर उद्योजकाची पत्नीसह आत्महत्या
बनावट दस्त करून बँकेला सव्वा बारा कोटीला गंडा

 

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली