Mohanlal: मोहनलाल यांचा सिनेमा ठरला ब्लॉक बस्टर!

Mohanlal

Mohanlal

कोची : ज्येष्ठ अभिनेते मोहनला आणि पृथ्वीराज सुकुमारन अभिनित L2: Empuran हा थ्रिलरपट ब्लॉक बस्टर ठरला आहे. दोनशे कोटींचा टप्पा या सिनेमाने अवघ्या पाच दिवसांत पार केला. (Mohanlal)

हा सिनेमा सुरुवातीपासूनच वादात सापडला होता. मात्र या सिनेमाने प्रेक्षक खेचण्यात यश मिळवले. अगदी पहिल्या शो पासूनच त्याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. काही सामाजिक संघटनांकडून या सिनेमाला व्यापक विरोध झाला. तसेच सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने १७ कट सुचवले. तरीही या सिनेमाच्या कमाईची चढती कमान सुरूच आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, हा सिनेमा प्रचंड यशस्वी ठरला आहे. (Mohanlal)

सोमवारी (३१ मार्च) कलेक्शनमध्ये थोडीशी घट झाली. मात्र तरीही १० कोटीच्यावर त्याने कमाई केली. या दिवशी सिनेमाने जवळपास ११ कोटी रुपये कमावले. यामुळे त्याचे एकूण देशांतर्गत कलेक्शन ७० कोटी रुपये झाले आहे.

निर्मात्यांच्या मते, चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपये कमावले आहेत. मोहनलाल यांनीच एक्सवर ही बातमी शेअर केली आहे, “द ओव्हरलॉर्डने २०० कोटींचा टप्पा पार केला! EMPURAAN इतिहास रचतो! #L2E #Empuraan,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

हिंदी पट्ट्यात या सिनेमाची स्पर्धा सलमान खानच्या अलिकडच्या रिलीज झालेल्या ‘सिकंदर’ शी आहे. या सिनेमावर समीक्षकांनी टीका केली आहे. रविवारी या चित्रपटाची निराशाजनक सुरुवात झाली. त्याने २६ कोटी रुपये कमावले. सिकंदरमध्ये सलमानचा अभिनय अपेक्षेपेक्षा कमी राहिला असला तरी, त्याने हिंदी पट्ट्यात L2: Empuran समोर आव्हान ठेवले आहे. (Mohanlal)
L2: Empuran रिलीजच्या अवघ्या पाच दिवसांतच सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट बनला आहे. सध्या अव्वल स्थानावर चिदंबरम एस. पोदुवल यांच्या ‘मंजुम्मेल बॉईज’ आहे. ज्याने २४०.५ कोटी रुपये कमावले आहेत. L2: Empuran ने आपली घोडदौड कायम राहिली तर तो लवकरच मंजुम्मेल बॉईजला मागे टाकेल आणि आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट ठरेल, असे समीक्षकांचे मत आहे.

हेही वाचा :

पदार्पणातच ‘मोहाली बॉय’ चा विक्रम

Related posts

Royal Challengers : बेंगळुरू पुन्हा विजयपथावर

Archery Gold : भारताला तिरंदाजीत सुवर्ण

आजच्या तरुणाईची सर्वांगसुंदर `… लव्हस्टोरी`