नवी दिल्ली : भारताने स्वदेशी पिनाका मल्टी-लाँच तोफखाना रॉकेट प्रणाली फ्रान्सला देऊ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान मोदी यांनी ही ऑफर दिली. फ्रेंच सैन्याने पिनाका प्रणाली वापरुन पाहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. (Modi france tour)
मोदी सध्या ‘एआय’ समीटच्या निमित्ताने फ्रान्स दौऱ्यावर आहेत. येथील दौरा आटोपून ते अमेरिकेला रवाना झाले आहेत.
फ्रान्सकडून भारताने २६ राफेल लढाऊ विमाने घेतली आहेत. तसेच तीन अतिरिक्त स्कॉर्पीन पाणबुड्यांच्या बांधकामात सहकार्याला अंतिम रूप दिले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशी पिनाका प्रणाली देण्याबाबत भाष्य केले.
भारत आर्मेनियाला पिनाकाची निर्यात करत आहे. काही आसियान आणि आफ्रिकन देशांनीही ही प्रणाली घेण्यात स्वारस्य दाखवले आहे. डीआरडीओने पिनाकाची विस्तारित श्रेणी विकसीत केली आहे. ती आणखी वाढवण्यात येणार आहे.(Modi france tour)
दरम्यान, भारत-फ्रान्सने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र, हेलिकॉप्टर इंजिन आणि जेट इंजिनमध्ये सुरू असलेल्या चर्चेचे स्वागत केले.
अमेरिका दौरा
दरम्यान, आयात शुल्क आणि इमिग्रेशनच्या मुद्द्यांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ताठर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि यूएस यांच्यातील भविष्यातील संबंध कसे असतील याची चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान मोदी बुधवारी वॉशिंग्टन डीसीमध्ये दाखल होत आहेत. त्यांचा मुक्काम व्हाईट हाऊसपासून जवळच असलेल्या ब्लेअर हाऊस या यूएस प्रेसिडेंशियल गेस्ट हाऊसमध्ये असणार आहेत. (Modi france tour)
यादरम्यान सहा द्विपक्षीय बैठका पार पडल्या आहेत. गुरुवारी संध्याकाळी ४ वाजता व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प-मोदी भेट आहे. त्यानंतर संध्याकाळी त्यांचे राष्ट्राध्यक्षांसोबत खासगी डिनर आहे. ओव्हल ऑफिसमध्ये बैठकीपूर्वी किंवा नंतर दोन्ही नेते माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे.
Thank you France!
A productive visit concludes, where I attended programmes ranging from AI, commerce, energy and cultural linkages.
Gratitude to President @EmmanuelMacron and the people of France. pic.twitter.com/dLkzPdJOsz
— Narendra Modi (@narendramodi) February 12, 2025
हेही वाचा :