न्यूयॉर्क : मंगळ ग्रहाची भारतीयांना मोठी भीती वाटते. पत्रिकेत मंगळ असेल तर त्या व्यक्तीला अनेक संकटांना सामोरे जावे लागते, असे मानले जाते. तथापि, वैज्ञानिकदृष्टीने पाहता ग्रह-ताऱ्यांची दुनिया काही अजबच असते. अवकाशातील घडामोडींचे कुतूहल सर्वांनाच असते. अशीच एक घटना लवकरच घडणार आहे. प्रखर लाल रंगाच्या हा मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार आहे. त्यामुळे तो नेहमीपेक्षा दहा हजार पटीने चमकणार आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला हे दृश्य पहायला मिळणार आहे. (Mars)
मंगळ पृथ्वीच्या जवळ येणे ही खगोलीय घटना आहे. दर २६ महिन्यांनी तो पृथ्वीच्या जवळ येतो. पण यावेळी तो अधिक जवळ येणार आहे. मंगळाची चमक एकदम भडक असते, पण ते सर्वसामान्यांना पाहता येत नाही. सर्व ग्रहापेक्षा मंगळ पृथ्वीच्याजवळ असल्याने तो लाल दिसतो. चांगल्या दर्जाच्या दुर्बिणीतून त्याचे दर्शन घेता येते.(Mars)
आता २०२५ मध्ये खास घटना घडणार आहे. अवकाशात पृथ्वी, मंगळ आणि सूर्य अशी स्थिती होणार आहे. या स्थितीत मंगळ ग्रहाला सूर्यकिरणे मिळणार नसल्याने हा ग्रह रात्री स्पष्ट आणि अधिक तेजस्वी दिसणार आहे. सूर्यास्तावेळी मंगळ ग्रहाचा उदय होतो तर सूर्येदयाला अस्त होतो. त्यामुळे सायंकाळी या ग्रहाचा नजारा पहायला मिळणार आहे.(Mars)
नवीन २०२५ सालातील पहिल्या तीन महिन्यात मंगळ ग्रह सामान्य नजरेनेही पाहता येणार आहे. १२ जानेवारी २०२५ रोजी मंगळ ग्रह पृथ्वीच्या एकदम जवळ असणार आहे. लाल रंगाचा मंगळ पृथ्वीपासून जवळपास ५९.७ दशलक्ष मैल दूर असणार आहे. या स्थितीत तो एकदम तेजस्वी दिसणार आहे. या दिवशी मंगळ ग्रह १० हजार पटीने तेजस्वी दिसणार आहे. मंगल ग्रह मिथुन राशीत येत असल्याने तो रात्री बराच वेळ आकाशात दिसणार आहे. मंगळाचा डिस्क आकार १४.६ आर्कसेकंद असणार आहे. दुर्बिणीशिवाय आकाशात मंगळ तेजस्वी रुपात पहायला मिळणार आहे. ज्यांच्याजवळ दुर्बिण आहे ती मंडळी मंगळाचे निरीक्षण अधिक चांगल्या पद्धतीने करु शकतात.