महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान, २३ ला निकाल

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याची घोषणा आज (दि.१५) मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत केली.  झारखंड दोन टप्प्यांत १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी २३ नोव्हेंबरला होईल.  निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबरला जारी होणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर असून ३० तारखेला अर्जांची छाननी होईल. (Maharashtra Assembly Elections 2024)

असा आहे विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम

महाराष्ट्रातील निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी जारी होईल. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी २९ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. तर, ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारीसाठी ४ नोव्हेंबर ही अखेरची तारीख आहे. तर, राज्यात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रात ९.६३ कोटी मतदार

महाराष्ट्रात एकूण २८८ मतदारसंघ आहेत. यामध्ये एकूण ९.२३ कोटी मतदार आहेत. यामध्ये ४.०७ कोटी पुरूष आहेत. तर ४.६६ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. राज्यातील तरुण मतदारांची संख्या १.८५ कोटी आहे. तर राज्यात १८ ते १९ वयोगटातील २०.९३ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी दिली.

हरियाणा-जम्मू-कश्मिरच्या मतदारांचे आभार

केंद्रीय निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हरियाणा आणि जम्मू-काश्मिरच्या मतदारांचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले, ज्याप्रकारे हरियाणा आणि जम्मू-काश्मिरमधील मतदारांनी निवडणूकीत सहभाग नोंदवला ते विशेष होते. निवडणूकीच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान दोन्ही राज्यात हिंसाचार झाला नाही. ही निवडणूक शांततेतच पार पाडल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. (Maharashtra Assembly Elections 2024)

प्रचाराला कमी कालावधी

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे. त्यापूर्वीच विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. २८ नोव्हेंबर पूर्वी राज्यात नवे सरकार अस्तित्वात येणार आहे. यामुळे लोकसभेसाकखा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला कमी कालावधी मिळणार आहे.

सणांचा विचार करत निवडणूकीचे वेळापत्रक

आगामी दिवाळी, छट पूजा आणि देव दिवाळी हे सण लक्षात घेवून निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख निवडली आहे. दसऱ्यानंतर आचारसंहिता आणि दिवाळीनंतर मतदान असे संकेत निवडणूक आयोगाने आधीच दिले होते.

यंदा २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान दिवाळी साजरी होत आहे. तर १५ नोव्हेंबरला देव दिवाळी आहे. छट महोत्सव ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान आहे. हिंदीपट्ट्यात देव दिवाळी आणि छट महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो.

महाराष्ट्र २०१९ च्या निवडणुकीतील राजकीय पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी

  • भाजप २५.७ टक्के
  • शिवसेना – १६.४ टक्के
  • काँग्रेस १५.९ टक्के
  • राष्ट्रवादी १६.७ टक्के

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ