कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांचा आखाडा सजलाय आणि या आखाड्यात लढण्यासाठी महाविकास आघाडीसह महायुतीमधील पैलवान तयार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या आखाड्यात कोणता पैलवान कोणत्या चिन्हावर उतरणार याच जागावाटप सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघा पैकी २ जागांवरील उमेदवार आता भाजपने घोषित केले आहेत. (Maharashtra Assembly Election)
निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपासाठी रात्रंदिवस बैठकांचे सत्र सुरू आहे. दोन्ही बाजूला बहुतांश जागा आणि उमेदवार निश्चित झाले आहेत. अशातच भाजपने आज (दि.२०) आपली पहिली यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये राज्यातील 99 उमेदवार जाहीर झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील उमेदवार सुद्धा घोषित करण्यात आले आहेत. कोल्हापूर दक्षिण मधून माजी आमदार अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर इचलकरंजी मधून नुकतच भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक विरूद्ध ऋतुराज पाटील सामना रंगणार
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ म्हणजे सतेज पाटील यांचा बालेकिल्ला आणि यंदा देखील दक्षिणच्या या रणांगणात पाटील विरुद्ध महाडिक असा सामना पाहायला मिळणार आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या ९९ उमेदवारांच्या यादीत अमल महाडिक यांच कोल्हापूर दक्षिणमधून नाव जाहीर करण्यात आला आहे. तर विद्यमान आमदाराला पुन्हा तिकीट या फॉर्मुलानुसार महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या चिन्हावर सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील यांना पुन्हा तिकीट मिळणार आहे. यामुळे अमल महाडिक यांना २०१९ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी संधी मिळाली आहे. (Maharashtra Assembly Election)
इचलकरंजी मतदारसंघात राहुल आवाडे मैदान मारण्याच्या तयारीत मात्र कट्टर भाजप कार्यकर्ते नाराज
मँचेस्टर सिटी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक दशकांपासून आवाडे कुटुंबियाचं वर्चस्व आहे. २०१९ च्या निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसला राम राम ठोकत अपक्ष निवडणूक लढवली आणि भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांचा ४९,८१० मतांनी पराभव केला. मात्र कालांतराने आवाडे यांनी भाजपला पाठिंबा देत मित्र पक्ष झाले. यानंतर गेल्या ५ वर्षात आवाडे यांची भाजपशी वाढलेली जवळीक हाळवणकर यांना हानिकारक ठरत होती. यामुळे आवाडे हाळवणकर यांच्यातील राजकीय संघर्ष शिघेला पोचलेल असताना, गेल्या महिन्यातच आवाडे पिता पुत्रांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. असे असले तरी इचलकरंजी मधील जुने भाजप कार्यकर्ते आणि हाळवणकर गटातील कार्यकर्ते नाराज आहेत. अशातच आता प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. यामुळे आवाडे यांना ही निवडणूक वाटत तितक सोपी नसणार आहे.यामुळे भाजपच्या या दोन पैलवान कश्या पद्धतीने आपला डाव खेळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
हेही वाचा :