Mahakumbh : महाकुंभमेळ्यात मुलायमसिंह यादव यांची मूर्ती

mahakumbha

प्रयागराज : हिंदूधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रयागराज येथे सोमवारी, १३ जानेवारीपासून महाकुंभमेळ्यास सुरुवात होत आहे. देशभरातील साधू-संत महाकुंभमेळ्यासाठी दाखल झाले आहेत. ४० कोटीहून अधिक भाविक महाकुंभमेळाव्यात उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. महामेळाव्यात देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यांची मूर्ती समारंभस्थळावर स्थापित करण्यात आली आहे. त्याबद्दल भाजप आणि साधू संतांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्तरप्रदेश विधानसभेतील नेते माता प्रसाद पांडे यांनी मुलायमसिंह यांच्या मूर्तीचे अनावरण केले.(Mahakumbh )

महाकुंभ परिसरातील सेक्टर सोळामध्ये स्मृती सेवा संस्थानच्या शिबिरात मुलायमसिंह यांची मूर्ती बसवली आहे. तीन फूट उंचीची मूर्ती काशाची आहे. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे माता प्रसाद पांडे म्हणाले, सरंक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना मुलायमसिंह यांनी घेतलेले निर्णय मैलाचे दगड ठरले आहेत. त्यांनी समाजातील दलित, अल्पसंख्याक, महिला, शेतकरी आणि युवकांच्या हितासाठी आयुष्यभर संघर्ष केला. आम्हाला आमचे नेते परमेश्वरसमान असल्याने आम्ही कुंभमेळ्यात मूर्ती बसवली आहे, असे समाजवादी पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.(Mahakumbh )

वादाला फुटले तोंड

शिबिराचे आयोजन केलेल्या संदीप यांनी सांगितले की, आम्ही भाविकांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. साधू-संत आणि गरजवंतांना आम्ही शालींचे वाटप केले आहे. दुसरीकडे उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी मुलायम यांच्या पुतळ्याला आक्षेप घेतला आहे. ज्यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी संघर्ष केला अशा राम भक्तांवर गोळीबाराचा आदेश देणाऱ्यांची मूर्ती महाकुंभ मेळाव्यात बसवणे ही चुकीची गोष्ट आहे, असे ते म्हणाले. या निर्णयामध्ये साधूसंतानीही नाराजी व्यक्त केली आहे. संताचे म्हणणे आहे की महाकुंभ मेळात देवी देवतांची मूर्ती बसवली जाते. त्यांची पूजा केली जाते. या ठिकाणी एका राजकीय नेत्यांची मूर्ती लावणे हा त्यांचा अपमान आहे. त्या प्रकारला आम्ही विरोध करणार आहोत.

हेही वाचा :
गोळी सुटली, आमदाराच्या डोक्यात घुसली…

Related posts

bullet went off : गोळी सुटली, आमदाराच्या डोक्यात घुसली…

US Snow storm : आगीपाठोपाठ हिमवादळ!

Lal Bahaddur Shastri : नेहरुंनी दिला होता शास्त्रींना ब्रेक