नवी दिल्ली :
‘एनआयए’च्या आरोपपत्राचा हवाला देत अहवालात म्हटले की, ही टोळी दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमधील ट्रक ऑपरेटर, दारू व्यापारी, व्यापारी यांच्याकडून पैसे उकळत असे. अहवालानुसार, तपास यंत्रणा म्हणते, ‘तपासात असे समोर आले आहे, की २०१९-२०२१ या वर्षात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने हवालाद्वारे थायलंड आणि कॅनडात वसुलीची रक्कम पाठवली आहे. गुन्हेगार, गुंड आणि खलिस्तान समर्थक सिंडिकेटचा तपास करणाऱ्या ‘एनआयए’ला आढळून आले आहे, की त्यांनी अवैध दारू आणि खंडणीतून मिळणारा नफा शेतजमीन, भूखंड, शस्त्रे आणि रसद यांमध्ये गुंतवला आहे. तपास यंत्रणेच्या आरोपपत्रात गँगस्टर कला जथेडीचाही उल्लेख आहे. त्यात म्हटले आहे, की २०१८-१९ दरम्यान, एका दारू ठेकेदाराने सोनीपत जिल्ह्यातील ११ झोनसाठी परवाने घेतले होते. त्यानंतर त्यांनी जठेडी गाव वगळता प्रत्येक झोनमध्ये दारूची दुकाने सुरू केली. हे गाव राय झोनमध्ये येते. परवाना असूनही काला जठेडीच्या दहशतीमुळे दारू व्यावसायिकाला जठेडी गावात दारूचे दुकान सुरू करता आले नाही.
गुरुग्रामची खांडसा मंडी हे वसुलीचे मोठे केंद्र होते. एजन्सीने गुंड कौशल चौधरीचाही उल्लेख केला आहे. त्यात म्हटले आहे, की २०१० पासून गुंड मंडीचा वापर खंडणीसाठी सोपे लक्ष्य म्हणून करत आहेत. सुरूवातीला खंडणी संघटित होत नसल्याने गुन्हेगार रस्त्याच्या कडेला बसलेल्या व्यापाऱ्यांकडून साथीदारांच्या मदतीने पैसे उकळायचे. तपासात असे समोर आले आहे, की प्रत्येक ट्रक ऑपरेटरला दरमहा २५ हजार रुपये कौशल चौधरी सिंडिकेटला द्यावे लागत होते. तो बिश्नोई सिंडिकेटचा प्रतिस्पर्धी आहे. अहवालानुसार, एजन्सीने सांगितले, की ट्रक आणि जनरेटर ऑपरेटरला दरमहा १ लाख २५ हजार ते १ लाख रुपये टोळीला द्यावे लागत होते. त्यामुळे पॉलिथिनसारख्या अनेक वस्तूंचे भाव वाढल्याचे बोलले जात आहे. (Lawrence Bishnoi)
हेही वाचा :