अभिनेते दिल्ली गणेश यांच्यावर अंत्यसंस्कार

Delhi Ganesh file photo

चेन्नई; वृत्तसंस्था : ज्येष्ठ चित्रपट अभिनेते थिरू दिल्ली गणेश यांच्यावर आज (दि.११) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय हवाई दलाच्या जवानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दिल्ली गणेश यांनी एक दशक भारतीय हवाई दलात सेवा बजावली होती. दिल्ली गणेश यांनी चित्रपटांकडे वळण्यापूर्वी १९६४ ते १९७४ या काळात भारतीय हवाई दलात सेवा बजवाली होती.

वयाच्या 80 व्या वर्षी जगाचा घेतला निरोप

दिल्ली गणेश यांचा जन्म १ ऑगस्ट १९४४ रोजी झाला होता. १९७६ मध्ये त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या पट्टिना प्रवेशम या चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. आपल्या चित्रपट प्रवासात त्यांनी ४०० हून अधिक तामिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. नायकन (१९८७) आणि मायकल मधना कामराजन (१९९०) यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ते ओळखले जात होते.

तामिळ चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच अभिनेत्यांसह काम करणाऱ्या दिल्ली गणेश यांचे शनिवारी रात्री (दि.९) वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. याबाबत त्यांचा मुलगा महादेवनने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. यावेळी महादेवन यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले होते की, “आम्हाला हे कळवायला अतिशय दुःख होत आहे की, आमचे वडील श्री दिल्ली गणेश यांचे ९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता निधन झाले.

पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिल्ली गणेशाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी काल एक्स हँडलवरून लिहले की, ‘लोकप्रिय चित्रपट व्यक्तिमत्त्व थिरू दिल्ली गणेश यांच्या निधनाची माहिती समजताच अत्यंत दु:ख झाले. त्यांना अतुलनीय अभिनय कौशल्याचे वरदान लाभले होते. त्यांनी प्रत्येक भूमिका उत्कृष्टपणे निभावली. यासह ते नेक पिढ्यांमधील प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याच्या त्याच्या क्षमतेसाठी ते नेहमीच लक्षात राहतील. त्यांना रंगभूमीचीही आवड होती. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत. ओम शांती’.

हिंदी चित्रपटही केले काम

दिल्ली गणेश यांनी आपल्या कारकिर्दीत ४०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांनी रणबीर कपूरच्या अजब प्रेम की गजब कहानी आणि शाहरुख खानच्या चेन्नई एक्सप्रेसमध्येही काम केले होते. याशिवाय २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या दास चित्रपटाचाही ते भाग होते. हा त्यांचा हिंदी डेब्यू चित्रपट होता. त्यांनी ओटीटीच्या जगातही प्रवेश केला होता. ते विजय सेतुपतीच्या नवरस या वेबसिरीजमध्ये दिसले होते. याशिवाय तो अमेरिका मॅपिल्लई या चित्रपटातही दिसला होते.

या पुरस्कारांनी सन्मानित

दिल्ली गणेशने पासी (१९७९) मधील अभिनयासाठी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार विशेष पुरस्कार मिळाला होता. १९९४ मध्ये कलामामणी पुरस्कारासह अनेक राज्य सन्मान त्यांनी मिळवले. गणेश यांनी दिल्लीतील नाट्य मंडळ, दक्षिण भारत नाटक सभेचे सदस्य म्हणूनही काम केले.

Related posts

bullet went off

bullet went off : गोळी सुटली, आमदाराच्या डोक्यात घुसली…

Mahakumbh

Mahakumbh : महाकुंभमेळ्यात मुलायमसिंह यादव यांची मूर्ती

US Winter Stoem

US Snow storm : आगीपाठोपाठ हिमवादळ!