कोल्हापूर : प्रतिनिधी : बलाढ्य शिवाजी तरुण मंडळाला संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल क्लबने २-२ असे बरोबरीत रोखले, पाटाकडील तालीम मंडळ ब संघाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर ३-२ असा फरकाने विजय मिळवला. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित केएसए अ गट वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Kop Football)
बलाढ्य शिवाजी तरुण मंडळाचे आव्हान पेलताना पूर्वार्धात जुना बुधवार पेठ संघाने धक्का दिला. सामन्याच्या तेवीसाव्या मिनिटाला रिंकू सिंहने गोल करत जुना बुधवार संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी मध्यंत्तरापर्यंत टिकवण्यात जुना बुधवारला यश आले.(Kop Football)
उत्तरार्धात परतफेड करण्याच्या ईर्ष्यंने मैदानात उतरलेल्या शिवाजी तरुण मंडळाने ४८ व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्यांच्या करण चव्हाण बंदरच्या अचूक हेडरने चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला. सामना बरोबरीत आल्यानंतर शिवाजी तरुण मंडळाने खोलवर चढाया केल्या. सामन्याच्या ७४ व्या मिनिटाला करण चव्हाण बंदरेने वैयक्तिक आणि संघांचा दुसरा गोल केला. शिवाजी सामना जिंकणार असे वाटत असताना सामना संपण्यापूर्वी एक मिनिट अगोदर ७९ व्या मिनिटाला जुना बुधवारने बरोबरी साधली. जुना बुधवारकडून तेजस जाधवने केला. पूर्णवेळेत सामना २-२ असा बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळविला. या स्पर्धेत यापूर्वी झालेल्या सामन्यात जुना बुधवारने पाटाकडील तालीम मंडळ अ संघाला बरोबरीत रोखले. आजच्या सामन्यातही शिवाजी संघाला बरोबरी रोखल्याने सर्व संघाच्या नजरा जुना बुधवारकडे लागल्या आहेत.(Kop Football)
तत्पूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात पाटाकडील ब संघाने फुलेवाडीवर २-१ अशी मात केली. पूर्वार्धात पाटाकडीलच्या रोहन कांबळेने २६ व्या मिनिटाला गोल केला. हीच आघाडी मध्यंत्तरापर्यंत टिकली. उत्तरार्धात ५१ व्या मिनिटाला अलेश सावंतने गोल करत फुलेवाडीला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. सामन्याच्या ७३ व्या मिनिटाला पाटाकडीलच्या महमंद अत्तारने गोल केला. महमंदचा गोल निर्णायक ठरला. आजच्या विजयाने पाटाकडीलला तीन गुण मिळाले.
- बुधवारचे सामने
- प्रॅक्टिस फुटबॉल क्लब वि. वेताळमाळ तालीम मंडळ : दुपारी २.०० वा.
- पाटाकडील तालीम मंडळ अ वि. सम्राटनगर स्पोर्टस् क्लब : दुपारी ४.०० वा.
हेही वाचा :
मेदवेदेव, फ्रिट्झ यांची आगेकूच
सिंधूची विजयाने सुरुवात