Home » Blog » Kolhapur RTO : ‘दीपावली’ च्या पार्श्वभूमीवर खाजगी बसेसची तपासणी मोहीम

Kolhapur RTO : ‘दीपावली’ च्या पार्श्वभूमीवर खाजगी बसेसची तपासणी मोहीम

by प्रतिनिधी
0 comments
Kolhapur RTO

कोल्हापूर  : प्रतिनिधी :   दीपावली  सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून जादा भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी तसेच रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) कोल्हापूर यांच्यामार्फत खाजगी कंत्राटी बसेसची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रवाशांना सुरक्षित व न्याय दरात प्रवास करता यावा, यासाठी ही मोहीम आज, १० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर  या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. दीपावली सणाच्या दरम्यान खाजगी कंत्राटी बसचालक व मालकांनी शासनाने ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे कोणत्याही परिस्थितीत आकारू नये.  तपासणी दरम्यान जादा भाडे आकारल्याचे  आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार   संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. (Kolhapur RTO)

 या विशेष तपासणीत मोहिमेदरम्यान खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची विविध बाबींवर काटेकोर तपासणी केली जाणार आहे. यात प्रामुख्याने विना परवाना किंवा परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालवणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्राशिवाय वाहन चालवणे, अशा नियमांचे उल्लंघन तपासले जाईल. (Kolhapur RTO)

 प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परावर्तीका, इंडिकेटर, टेललाईट, वायपर अशा सुरक्षा घटकांची स्थिती, वाहनात बेकायदेशीर फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे, मोटार वाहन कर भरलेला आहे की नाही, याची खात्री केली जाणार आहे. प्रवाशांकडून जादा भाडे आकारणी होत आहे की नाही, तसेच अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन निर्गमन दार कार्यरत आहेत की नाही याची तपासणी केली जाणार आहे. (Kolhapur RTO)

 दीपावली सणाच्या दरम्यान खाजगी कंत्राटी बसचालक व मालकांनी शासनाने ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे कोणत्याही परिस्थितीत आकारू नये.  तपासणी दरम्यान जादा भाडे आकारल्याचे  आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार   संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल.

प्रवाशांनीही प्रवासादरम्यान अडचणी आल्यास किंवा जादा भाडे आकारणी झाल्यास त्यांनी तात्काळ आपली तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ९४२३०१२१३४ वर किंवा ई-मेल – rtokolhapur.khatala@gmail.com वर नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांनी केले आहे. (Kolhapur RTO)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00