बेळगाव : प्रतिनिधी : मुलींने प्रियकराच्या सोबत पलायन केल्यामुळे मुलीच्या वडिलांनी मुलगी जिवंत असतानाच श्राद्ध घालून नातेवाईकांना जेवण घातल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नागराळ गावात घडली आहे. (Nagaral)
गावातील सुश्मिताचे विठ्ठल यांचे एकमेकांवर प्रेम होते. गुरुवारी दोघेही पळून गेले. मुलगी घरातून पळून गेल्याच्या घटनेने वडिलांना धक्का बसला. या घटनेमुळे दुःखी झालेल्या मुलीच्या वडिलांनी पळून गेलेल्या मुलीचे जिवंतपणी श्राद्ध घालून नातेवाईकांना घरी बोलवून बाराव्याचे जेवण घातले. भावपूर्ण श्रध्दांजली असा मजकूर लिहिलेला बॅनर देखील घराजवळ मुलीच्या वडिलांनी लावला आहे. याशिवाय मुलीच्या फोटोसमोर मृत व्यक्तीला नैवेद्य ठेवतात त्याप्रमाणे नैवेद्य ठेवला आहे. (Nagaral)
विठ्ठल याला सरकारी नोकरी आहे. सुष्मिताच्या वडिलांना चार मुली असून सर्वात लहान मुलगी सुष्मिता आहे. मुलगी पळून गेल्याने घराण्याच्या इभ्रतीला धक्का असल्याने वडीलांनी दु:खी होऊन श्राद्ध घातले. सुरुवातीला रायबाग पोलिस ठाण्यात मिसिंग कंप्लेंट दिली. त्यानंतर नातेवाईकांना पाहुण्यांना बोलावून मुलीचे फोटो पूजन करून जेवण घातले. (Nagaral)