कोल्हापूर : संशय खुनाचा पण…

कोल्हापूर : प्रतिनिधी : 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी याबाबतची माहिती दिली. नवे पारंगाव येथे नितीन मानसिंग भोसले (वय वर्षे ३०, रा. फडनायक  कॉलनी, वारणानगर, रा. – मोहरे, तालुका- पन्हाळा) या तरुणाचा आज (दि.१) सकाळी नवे पारगाव येथे मोटरसायकलसह मृतदेह सापडला. प्रथमदर्शनी हा खून असावा, अशी शंका आल्याने वडगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान काही व्यक्तींनाही ताब्यात घेतले. दरम्यान नितीन भोसलेचा मृतदेह विच्छेदनासाठी नवे पारगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदन केले असता नितीनलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. तसेच मृताच्या अंगावर भाजल्याच्या तसेच फुफ्फुसही जळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी