वैद्यकीय प्रवेश प्रकियेची  माहिती ‘नीट’ जाणून घ्या

दहावीनंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर मेडिकलला जाणार की इंजिनअरिगला जाणार हा प्रश्न विचाराला जातो. मेडिकलमध्ये प्रवेश घेणार असाल तर नीट परीक्षा द्यावी लागेल अशी सार्वत्रिक चर्चा असते. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) हा शब्द काही आपल्याला नवीन नाही. नीट परीक्षेसाठी . पालकच नाही तर विद्यार्थी या परीक्षेसाठी अगदी डोळ्यात तेल घालून अतोनात परिश्रम घेत असतात. या नीट परीक्षेबाबत  जाणून घेऊया.

नीट (NEET) म्हणजेच राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा, ही देशातील  वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षा आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएस (MBBS), बीडीएस (BDS), आयुष (AYUSH) आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते. नीट ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NTA) द्वारे आयोजित केली जाते.
नीट प्रवेश प्रक्रिया:
नोंदणी  : विद्यार्थ्यांनी एनटीएच्या  च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नीट  परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. नोंदणी प्रक्रियेमध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, आणि आवश्यक दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक आहे. नोंदणी शुल्क भरण्याची प्रक्रियाही या टप्प्यात पूर्ण केली जाते.

प्रवेश पत्र : नोंदणी यशस्वी झाल्यानंतर,  विद्यार्थ्यांना एनटीए द्वारे जारी केलेल्या प्रवेश पत्राची प्रिंटआउट काढावी लागते. प्रवेश पत्रामध्ये परीक्षेचे केंद्र, वेळ आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती असते. प्रवेश पत्राशिवाय विद्यार्थ्यांना नीट परीक्षेला प्रवेश मिळत नाही.

परीक्षा : नीट परीक्षा ही एक दिवसाची ऑफलाइन परीक्षा आहे. प्रश्नपत्रिका बहुपर्यायी (MCQ) स्वरुपात असते आणि त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र) या विषयांवर आधारित प्रश्न असतात. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असतो.

निकाल :  नीट परिक्षेनंतर काही आठवड्यांमध्ये एनटीए परीक्षेचा निकाल जाहीर करते. निकालामध्ये विद्यार्थ्यांचा स्कोर आणि रँक दिलेला असतो. निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडीप्रमाणे कॉलेजेसमध्ये प्रवेश दिला जातो.

काउंसिलिंग : निकाल जाहीर झाल्यानंतर, केंद्रीय आणि राज्य स्तरीय वैद्यकीय काउंसिलिंग प्राधिकरणे काउंसिलिंग प्रक्रिया आयोजित करतात. विद्यार्थी त्यांच्या रँकनुसार आणि निवडीप्रमाणे उपलब्ध सीट्ससाठी अर्ज करतात. काउंसिलिंग प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडीप्रमाणे कॉलेज आणि कोर्स मिळतो.

उपलब्ध कॉलेजची संख्या : भारतामध्ये नीट द्वारे विविध वैद्यकीय कॉलेजेसमध्ये प्रवेश घेता येतो. या कॉलेजेसमध्ये सरकारी तसेच खाजगी कॉलेजेस यांचा समावेश आहे. खालीलप्रमाणे काही प्रमुख प्रकारांमध्ये कॉलेजेस विभागले जातात.  

सरकारी वैद्यकीय कॉलेजेस: भारतातील सर्व राज्यांमध्ये सरकारी वैद्यकीय कॉलेजेस आहेत. या कॉलेजेसमध्ये शैक्षणिक फी कमी असते आणि शासनाद्वारे अनुदान दिले जाते. सरकारी कॉलेजेसमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उच्च रँक आवश्यक असते. सरकारी कॉलेजेसमध्ये विद्यार्थी उत्कृष्ट शिक्षण आणि क्लिनिकल प्रशिक्षण मिळवू शकतात.

खाजगी वैद्यकीय कॉलेजेस :  सरकारी कॉलेजेसच्या तुलनेत खाजगी वैद्यकीय कॉलेजेसमध्ये शैक्षणिक फी जास्त असते. परंतु, येथील सोयीसुविधा आणि शिक्षणाचा दर्जा चांगला असतो. खाजगी कॉलेजेसमध्ये देखील नीट रँकच्या आधारे प्रवेश दिला जातो. काही खाजगी कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट कोटा आणि एनआरआय कोटा यांच्यामार्फतही प्रवेश मिळतो.

 केंद्रीय संस्थान: AIIMS, JIPMER आणि AFMC सारख्या काही विशेष केंद्रीय वैद्यकीय संस्थानांमध्ये देखील नीट द्वारे प्रवेश घेतला जातो. या संस्थानांमध्ये प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा असत होती, परंतु आता नीट एकमेव पात्रता परीक्षा म्हणून स्वीकारली जाते. या संस्थानांमध्ये उत्कृष्ट शिक्षण आणि संशोधन सुविधा उपलब्ध आहेत.

एकूण सीट्स : भारतामध्ये नीट द्वारे विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी लाखो सीट्स उपलब्ध आहेत. यामध्ये एमबीबीएस, बीडीएस, आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध, आणि योग व नॅचरोपथी) या अभ्यासक्रमांसाठी विविध कॉलेजेसमध्ये एकूण सीट्स उपलब्ध आहेत.

१. एमबीबीएस सीट्स : एमबीबीएस  हा सर्वाधिक मागणी असलेला अभ्यासक्रम आहे. भारतात सुमारे ५४२ वैद्यकीय कॉलेजेस आहेत, ज्यामध्ये एकूण एमबीबीएस सीट्स ८२ हजार पेक्षा जास्त आहेत.

२. बीडीएस  सीट्स : बीडीएस  (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी) हा दंतचिकित्सेतील प्रमुख अभ्यासक्रम आहे. भारतात सुमारे ३१५ दंत वैद्यकीय कॉलेजेस आहेत, ज्यामध्ये एकूण बीडीएस सीट्स २६ हजार पेक्षा जास्त आहेत.

३. आयुष सीट्स : आयुषमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध, आणि योग व नॅचरोपथी हे अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. भारतात आयुष अभ्यासक्रमांसाठी सुमारे ५२ हजार  सीट्स उपलब्ध आहेत

Related posts

पोटातले ओठावर!

हिंदुदुर्ग!

Lok Sabha : खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ