कराडचे यशवंत कृषी प्रदर्शन निवडणुकांमुळे लांबणीवर

कराड; प्रतिनिधी : कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेले १९ वे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशू-पक्षी प्रदर्शन, कृषी महोत्सव यावर्षी तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर गेले आहे. राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर ऐवजी डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार असल्याची माहिती कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उपसभापती संभाजी काकडे, संचालक विजयकुमार कदम, संभाजी चव्हाण, नितीन ढापरे, श्री. शंकरराव इंगवले, जयंतीलाल पटेल, जे. बी. लावंड, सर्जेराव गुरव, प्रभारी सचिव ए. आर. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. पाटील म्हणाले, प्रतिवर्षी लाखो शेतकरी या प्रदर्शनाला भेट देऊन आधुनिक शेती, तंत्रज्ञानाची माहिती घेत असतात. या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग, महसूल व सहकार विभाग, तसेच इतर विविध विभाग सहभागी होऊन शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतात.

यावर्षी प्रथमच प्रदर्शन कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू असून ही सर्व शासकीय यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त आहे. तसेच ज्या मैदानात प्रदर्शन भरवण्यात येते, ते मैदानही निवडणूक कामासाठी आयोगाकडे वर्ग करण्यात आहे. त्यामुळे प्रदर्शन ६ ते १० डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी