महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मोर हा पक्षी शहरातील लोकांसाठी फार दुर्मिळ दर्शन देणारा पक्षी आहे. आपल्यापैकी अनेकजण तर असे आहेत ज्यांनी अजूनही प्रत्यक्षात कधी मोर पाहिलेला नाही. मात्र कोकणातील कणकवली जवळील असरोंडी गावातील एका आजींच्या घरी दररोज एक मोर त्यांची भेट घ्यायला येतो. तुम्हाला हे खोटं वाटत असेल तर खाली या मोराच्या भेटीचा व्हिडीओ आहे तो पाहिल्यावर तुमचा यावर नक्कीच विश्वास बसले. कणकवलीपासून काही अंतरावर असलेल्या एका गावातील आजींची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. कारण आहे या आजींना रोज भेटायला येणारा मोर ! (Kankavli Viral Video)
मुक्या प्राण्यांवर केलेलं प्रेम ते निर्व्याज परत करतात.याची अनेक उदाहरण यापूर्वीही पाहायला मिळाली आहेत. इन्स्टाग्रामवर सक्रीय असलेल्या अमोल सावंत या तरुणाने या आजी आणि मोराच्या भेटीसंदर्भातील व्हिडीओ काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अमोलने या व्हिडीओमध्ये हा मोर आजींना भेटायला का येतो याची रंजक गोष्ट सांगितली आहे. (Kankavli Viral Video)
का रोज भेटायला येतो?
आजींचं घर जंगलाच्या जवळ आहे. आठ वर्षांपूर्वी आजींनी नेहमीप्रमाणे कोंबड्यांना खायला घातलेले दाणे खाण्यासाठी एक मोराचं पिल्लू आलं. ते पिल्लू या कोंबड्यांसाठी टाकलेले दाणे खाऊ लागलं. तेव्हापासूनच जेव्हा जेव्हा आजी कोंबड्यांसाठी दाणे टाकतात तेव्हा तेव्हा हा मोर तिथं येऊन हे दाणे खातो, असं अमोलने व्हिडीओत सांगितलं आहे. याधूनच आजी आणि या मोराचं अनोखं नातं निर्माण झालं आहे. इतर लोक आल्यावर हा मोर जंगलात पळून जातो.
हेही वाचा :