Rajmata-Gaumata : देशी गाय ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित; सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्य सरकारने विधानसभा निवडणुकपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. देशी गायी ‘राज्यमाता- गोमाता’ (Rajmata-Gaumata ) म्हणून घोषित केल्या आहेत.

Rajmata-Gaumata : देशी गाय ‘राज्यमाता- गोमाता’

राज्यसरकारने जाहीर केलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हंटले आहे. “देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान,  दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच  शेण व गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून देशी गायींना यापुढे “राज्यमाता- गोमाता” म्हणून घोषीत करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आज (दि.३०) घेतला आहे.”

देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट

प्रसिद्ध पत्रकात पुढे म्हंटले आहे, “प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक काळापासून  धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना “कामधेनू” असे संबोधण्यात येते. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. (उदा. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ) त्याचबरोबर, दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.

देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मुल्य आहे. तसेच दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पुर्ण अन्न आहे.  आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पध्दतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पध्दतीत  शेण व गोमुत्राचे महत्व विचारात घेता, देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. ही पार्श्वभूमी विचारात घेवून, पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषण करण्यास प्रेरित करण्याच्या दृष्टीने देशी गायीस “राज्यमाता- गोमाता घोषित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. “

हेही वाचा 

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ